पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | शोरुममध्ये येताना बाहेर पर्स न ठेवता आत प्रवेश केल्याने शोरुममधील महिला मालक व
कर्मचार्याने महिलाला शिवीगाळ करुन चोर ठरवत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)
याप्रकरणी नर्हे येथील एका २५ वर्षाच्या महिलेने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०७/२३) दिली आहे.
त्यानुसार पोलिसांनी सिंहगड रोडवरील व्हॅन ह्युसेन शोरुमच्या (Van Heusen Showroom) महिला मालक व तेथील एका कर्मचार्यावर विनयभंगाचा
(Molestation) गुन्हा दाखल केला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सव्वा सहा वाजता घडली.
Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचे पती कपडे खरेदी करण्यासाठी सिंहगड रोडवरील व्हॅन ह्युसेन शोरुममध्ये गेले होते. फिर्यादी यांनी त्यांच्याकडील पर्स शोरुमच्या पर्स ठेवण्याच्या जागेवर ठेवली नाही. त्या पर्स घेऊन आत आल्या. तेव्हा शोरुमची महिला मालक त्यांच्या जवळ आली. तिने तू तुझी पर्स आतमध्ये का घेऊन आलीस, असे म्हणून तूला अक्कल नाही का, तू चोर आहेस, हीची पर्स चेक करा, असे म्हणाली. यावरुन फिर्यादी व तिच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याने फिर्यादीच्या अंगावर धावून गेली. तेव्हा तेथील कर्मचार्याने स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, अशा पद्धतीने त्यांचे डाव्या खांद्याला हात लावून मागे ढकलून फिर्यादी यांना अपमानास्पद पद्धतीने बाहेर काढले. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करीत आहेत.
Web Title :- Pune Crime News | Pune-Dattawadi Crime News : Woman molested by bringing purse to showroom; Incident at Van Heusen Showroom on Sinhagad Road
Pune Crime News | पुणे-रास्ता पेठ क्राईम न्यूज : खंडणीसाठी दुकानदारांना मारहाण, चौघांना अटक
Jayant Patil | राज्यातील सरकार स्थिर…, अजित पवारांच्या विधानावर जयंत पाटील म्हणाले…