IMPIMP

Pune Crime News | पुणे-रास्ता पेठ क्राईम न्यूज : खंडणीसाठी दुकानदारांना मारहाण, चौघांना अटक

by nagesh
Pune Crime News | Pune-Rasta Peth Crime News: Shopkeepers beaten up for extortion, four arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Crime News | सध्या रमजान महिना सुरु आहे. रास्ता पेठेतील गुंडांना ईद साजरी करण्यासाठी गोव्याला
जायचे आहे. त्यासाठी ते दुकानदारांकडून खंडणी (Extortion Case) वसुल करत होते. पैसे देण्यास नकार देणार्‍यांना त्यांनी मारहाण (Beating)
करण्याचा प्रकार रस्ता पेठेत घडला. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी समर्थ पोलिसांनी (Pune Police) अमन इब्राहिम खान Aman Ibrahim Khan (वय २१), हमजा तसावर शेख (Hamza Tasawar Shaikh), हुजेफा शेख (वय १९), मोहम्मद शेख (वय १९, सर्व रा. रस्ता पेठ) यांना अटक केली आहे. अमन खान आणि हमजा शेख हे रेकॉर्डवरील गुन्हेगार (Criminal) आहेत.

 

याप्रकरणी नावेद जाकिर अन्सारी Naved Zakir Ansari (वय २४, रा. नाना पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात (Samarth Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ९५/२३) दिली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे रास्ता पेठेत उबेद मोबाईल शॉपी हे दुकान आहे. ते व त्यांचा भाऊ उबेद अन्सारी हे १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता दुकानात होते. त्यावेळी आरोपी दुकानात आले. ईद मनाने को गोवा जाने का है, उसके लिए चंदा दो, नही दिया तो तुम्हारा मुँह फोड के, दुकान भी फोड देंगे, असे म्हणून खंडणी (Ransom) मागितली. फिर्यादी यांनी नकार दिला असता हमजा शेख याने त्याच्याकडील काठीने व अमन खान याने त्यांच्याकडील लोखंडी पान्ह्याने फिर्यादीच्या डोक्यावर व हातावर मारहाण करुन गंभीर जखमी केले. त्यांच्या भावाला मारहाण करुन दुकानाचे नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक लोणारे तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Crime News | Pune-Rasta Peth Crime News: Shopkeepers beaten up for extortion, four arrested

 

हे देखील वाचा :

Pune Crime News | पुणे-सिंहगड रोड क्राईम न्यूज : नवजात अर्भकाला हॉस्पिटलच्या खिडकीतून फेकून दिल्याने मृत्यु; 19 वर्षाच्या तरुणीचे धक्कादायक कृत्य

National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura | देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे; राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा

Jayant Patil | राज्यातील सरकार स्थिर…, अजित पवारांच्या विधानावर जयंत पाटील म्हणाले…

MVA Vajramuth Sabha | ‘वज्रमूठ सभे आधीच काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर’, ‘या’ दिग्गज नेत्याची दांडी

 

Related Posts