IMPIMP

Jayant Patil | राज्यातील सरकार स्थिर…, अजित पवारांच्या विधानावर जयंत पाटील म्हणाले…

by nagesh
Jayant Patil | government in the state stable jayant patil also confirmed ajit pawars statement

नागपूर :  सरकारसत्ता ऑनलाईन – सरकारकडे संख्याबळ असल्याने सरकार अस्थिर नाही हे वास्तव आहे. सुप्रीम कोर्टाचा (Supreme Court)
निकाल लागल्यानंतर काय होणार, तेव्हा काय परिस्थिती असेल त्यावर आता कुणालाही काही सांगता येणार नाही. मात्र सरकार स्थिर असताना ते अस्थिर
आहे, असं बोलणं योग्य नाही. खरे बोलले तरी या राज्यात शिक्षा होते असं विधान राष्ट्रवादीचे (NCP) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले
आहे. नागपूर येथे होत असलेल्या वज्रमूठ सभेसाठी (MVA Vajramuth Sabha) जयंत पाटील (Jayant Patil) नागपूरात आले होते. त्यावेळी ते
माध्यमांशी बोलत होते.

 

जयंत पाटील (Jayant Patil) पुढे म्हणाले, 16 आमदार अपात्र झाले तरीही जेवढी संख्या लागेल तेवढी सरकारकडे आहे. अजित पवार आणि राष्ट्रवादी
यांना लाखोली वाहून जे मविआतून बाहेर पडले, ते आज त्यांच्या येण्याची वाट पाहत आहेत त्याचे कौतुक वाटते. गुलाबराव पाटील (Gulabrao Patil)
असो वा शिवसेनेतील (Shivsena) बाहेर गेलेले जे सदस्य आहेत. भाजपकडे (BJP) जाणारी वक्तव्य त्यांनी आठवली तर आपल्याला आश्चर्य वाटले
असेही पाटील म्हणाले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

जयंत पाटील पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्दल गैरसमज पसरवणे ही भाजपची खेळी आहे. मविआची सभा (Maharashtra Political News) लोकांना नव्या मुद्याची माहिती देणारी असेल. आमच्या घटक पक्षांनी एकत्र येऊन सभा  आयोजित केली आहे. मविआचे घटक पक्ष सभेला उपस्थित राहतील. सभा वेळेत व्हावी यासाठी प्रत्येक पक्षाचे दोन सदस्य बोलणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

 

Web Title :- Jayant Patil | government in the state stable jayant patil also confirmed ajit pawars statement

 

हे देखील वाचा :

National Commission for Minorities – Iqbal Singh Lalpura | देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी सर्वांनी मिळून काम करावे; राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इकबाल सिंह लालपुरा

MVA Vajramuth Sabha | ‘वज्रमूठ सभे आधीच काँग्रेसमधील नाराजी चव्हाट्यावर’, ‘या’ दिग्गज नेत्याची दांडी

Maharashtra Political News | अजित पवारांसह ‘या’ दोन नेत्यांची अमित शहांबरोबर बैठक झाली, शिंदे गटाच्या आमदाराचा मोठा दावा

Shree Rukmini Collection | पारंपारिक आभूषणावर आधारित श्री रुक्मिणी कलेक्शन सादर

 

 

Related Posts