IMPIMP

Pune Crime News | फुरसुंगी रोडवरील लॉजवर छापा, सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; ‘सासु’ने केली 5 महिलांची सुटका

by nagesh
Pune Crime News | Pune Police Crime Branch SS Cell Raid on the lodge on Fursungi Road Hadapsar Police Station Limits

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | सामाजिक सुरक्षा विभागाने (SS Cell Pune) फुरसुंगी रोडवरील (Fursungi Road) एका लॉजवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचा (Prostitute Business) पडदा पाश केला आहे. या ठिकाणी वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलेल्या ५ महिलांची सुटका केली आहे. (Pune Crime News)

 

याबाबत मारुती महादेव जाधव Maruti Mahadev Jadhav (वय ३०, रा. पापडे वस्ती, भेकराईनगर, हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस नाईक मनिषा पुकाळे यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४४/२३) दिली आहे.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फुरसुंगी रोडवरील हरपळे वस्ती येथे स्वर्ग लॉज आहे.
या ठिकाणी वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी सव्वा चार वाजता येथे छापा टाकला.
मारुती जाधव हा तेथे महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे आढळून आले.
२३ ते ३५ वयोगटातील ५ महिलांना तेथून ताब्यात घेण्यात आले. पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

ही कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे
यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक अश्विनी पाटील, पोलिस अंमलदार राजेंद्र कुमावत,
मनिषा पुकाळे, तुषार भिवरकर, हणमंत कांबळे, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने केली आहे.

 

Web Title :- Pune Crime News | Pune Police Crime Branch SS Cell Raid on the lodge on Fursungi Road Hadapsar Police Station Limits

 

हे देखील वाचा :

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पेठ पोटनिवडणुकीसाठी 13 अपक्षांसह 21 उमेदवार रिंगणात, शुक्रवारपर्यंत उमेदवारी माघारीची मुदत

Pune PMC News | ग्रामस्थांच्या विरोधानंतरही शासनाच्या दबावाखाली महापालिकेची फुरसुंगी आणि उरूळी देवाची गावे वगळण्याची प्रक्रिया सुरू; शहर सुधारणा समितीमध्ये दोन्ही गावे वगळण्याचा प्रस्ताव मंजूर

 

 

Related Posts