IMPIMP

Pune Crime News | हॉटेल वैशालीच्या मालकीवरुन पुन्हा राडा; हॉटेलमध्ये तोडफोड करुन जीवे मारण्याची धमकी

by nagesh
Pune Crime News | Rada again over the ownership of Hotel Vaishali; Threats to vandalize the hotel and kill

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन –  Pune Crime News | फर्ग्युसन रोडवरील (Fergusson College Road) प्रसिद्ध हॉटेल वैशाली (Hotel Vaishali Pune) हिच्या मालकीवरुन पुन्हा एकदा राडा झाला असून हॉटेलचे संस्थापक जगन्नाथ शेट्टी (Jagannath B Shetty) यांच्या मुलीला तिचा पती गुंडांना घेऊन येऊन धमकाविल्याचे समोर आले आहे. (Pune Crime News)

याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी इरफान शेख, सुशील सांडभोर, विश्वजीत जाधव, चौधरी व इतर ७ जणांवर बेकायदेशीर जमाव जमवून धमकाविल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत निकिता जगन्नाथ शेट्टी (वय ३४, रा. मोदीबाग, शिवाजीनगर) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १०३/२३) दिली आहे. हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील हॉटेल वैशालीमध्ये गुरुवारी सकाळी ६ वाजता घडला.

जगन्नाथ शेट्टी यांनी हॉटेल वैशालीची उभारणी करुन त्याला नावलौकित मिळवून दिला. त्यांची मुलगी निकिता शेट्टी हिचा विवाह विश्वजीत जाधव यांच्याशी झाला होता. जाधव याने तिच्या डोक्याला पिस्तुल लावून हॉटेलच्या मालकीच्या कागदपत्रावर सह्या घेतल्याची फिर्याद काही दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इरफान शेख याने विश्वजीत जाधव याच्या सांगण्यावरुन हॉटेल सुरु होत असताना सकाळी ६ वाजता हॉटेलचे पुढील दरवाजाचे कुलूप तोडून बेकायदा आत प्रवेश केला. त्याच्याबरोबरच्या साथीदारांनी व विश्वजीत जाधव, चौधरी यांनी फिर्यादी यांच्या कामगारांना हाताने मारहाण (Beating) करुन एका कोपर्‍यात बसविले. फिर्यादी यांच्या मालकी हक्काने असलेले नोटीस बोर्ड फाडून, क्यु आर कोड तोडून व सीसीटीव्हीच्या वायरी काढून ५ हजार रुपयांचे नुकसान केले. आरोपी चौधरी फिर्यादी यांना बोलला की अशा बर्‍याच प्रॉपट्या खाली केलेल्या आहेत. गपगुमान प्रॉपर्टी खाली करा, नाही तर जीवानिशी जाल, अशी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन ते निघून गेले. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Rada again over the ownership of Hotel Vaishali; Threats to vandalize the hotel and kill

Related Posts