IMPIMP

Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशनवर पोलिसांकडूनच ‘लुटमार’ ! 5 लाखाचे तोडपाणी? 6 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत, पण…

by nagesh
Pune Crime News | Robbery by police at Pune railway station! 5 lakh extortion? 6 policemen suspended, but...

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन  (नितीन पाटील) – Pune Crime News | पुणे रेल्वे स्टेशनवर (Pune Railway Station) चोख पोलिस बंदोबस्त
असतो, पोलिसांची करडी नजर संशयित प्रवाशांवर असते असे आपण नेहमी वाचतो आणि पाहतो देखील. मात्र, पुणे रेल्वे स्टेशनवरील एक धक्कादायक
प्रकार समोर आला आहे. रेल्वे स्टेशनवर बॅग तपासणीच्या नावाखाली भलताच ‘उद्योग’ केल्याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिस (Pune Lohmarg Police)
दलातील 6 पोलिस कर्मचार्‍यांना तडकाफडकी निलंबीत करण्यात आले आहे. त्यामध्ये पुणे लोहमार्ग पोलिस (Pune Railway Police) स्टेशनमधील 4
तर पुणे लोहमार्ग स्थानिक गुन्हे शाखेतील (Pune Railway LCB Police) दोन कर्मचार्‍यांचा समावेश आहे. दरम्यान, पोलिस कर्मचार्‍यांवर भलताच
‘उद्योग’ केल्याप्रकरणी कारवाई झाली खरी पण त्या 6 कर्मचार्‍यांना ‘त्याच-त्या’ ठिकाणी नेमणुक देणार्‍यांवर कारवाईचे काय असा प्रश्न निर्माण झाला
आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या प्रकरणाची माहिती घेण्यासाठी पुणे लोहमार्ग पोलिस स्टेशन, नियंत्रण कक्ष आणि संबंधितांना संपर्क साधला असता उडवाउडवीची उत्तरे मिळाली. एवढेच नव्हे तर पुणे लोहमार्ग पोलिस नियंत्रण कक्षामध्ये संबंधित अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक देखील उपलब्ध नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. अगदी पोलिस स्टेशनच्या बाहेर भल्या मोठया अक्षरात वरिष्ठांची नावे लिहून ठेवण्यात येतात मात्र त्यांचे संपर्क क्रमांकच नियंत्रण कक्षात उपलब्ध नसल्याचे समोर आल्याने पुणे लोहमार्ग पोलिस प्रवाशांना आणि तक्रारदारांना कशी वागणुक देत असतील याबाबत विचार देखील करायला नको. (Pune Crime News)

 

सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक बाळू पाटोळे (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पोलिस हवालदार सुनिल व्हटकर (एलसीबी, पुणे लोहमार्ग), पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यातील प्रशांत बजरंग डोईफोडे, जयंत गणपत रणदिवे, अमोल युवराज सोनवणे आणि विशाल दत्तात्रय गोसावी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निलंबीत करण्यात आलेल्या 6 पोलिस कर्मचार्‍यांची दि. 3 एप्रिल रोजी पुणे रेल्वे स्टेशनवर बॅग चेकिंगसाठी नियुक्ती करण्यात आली होती. दुपारच्या सुमारास एका युवकास आणि युवतीस पोलिसांनी संशयावरून थांबविले. पोलिसांना त्यांनी दिलेली उत्तरे असमाधानकारक वाटली. त्यामुळे पोलिसांनी त्या दोघांना पोलिस निरीक्षकाच्या समोर उभे केले. साधारणतः रात्री सात वाजण्याच्या सुमारास युवक-युवतीला सोडून देण्यात आले. त्याबाबतची स्टेशन डायरी देखील करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, युवक-युवतीकडून पोलिसांनी 5 लाख रूपये घेतले आणि त्यांना गांजा बाळगल्याच्या संशयावरून थांबविण्यात आले होते अशी माहिती पोलिस महासंचालक (लोहमार्ग, मुंबई) यांच्या कार्यालयाकडून पुणे लोहमार्ग पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांना कळविण्यात आली. (Pune Crime News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिस महासंचालक कार्यालयाकडून कळविण्यात आलेली माहिती अत्यंत धक्कादायक होती. त्यामुळे पुणे लोहमार्ग पोलिस स्टेशनमधील कर्मचारी तसेच अधिकार्‍यांची ‘भंबेरी’ उडाली. घटनेची चौकशी करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाल्याने संबंधित अधिकार्‍यांनी चौकशीस सुरूवात केली. त्यावेळी पुणे स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आली. त्यामध्ये काही बाबी संशयास्पद आढळून आल्या. त्यानंतर तात्काळ 6 पोलिस कर्मचार्‍यांना थेट घरचा रस्ता (निलंबन) Police Suspended दाखविण्यात आले आहे.

 

संशयावरून अडविण्यात आलेल्यांकडून एवढी मोठी रक्कम घेण्याची हिम्मत या पोलिस कर्मचार्‍यांची कशी झाला हा खरा प्रश्न आहे. एवढेच नव्हे तर त्यांची स्टेशन डायरीला नोंद केल्यानंतर देखील असा उद्योग नेमका कोणाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला हे अद्यापही गुदस्त्यातच आहे. निलंबीत करण्यात आलेले पोलिस कर्मचार्‍यांना नेहमी आणि काही कर्मचार्‍यांना तर वर्षानुवर्ष रेल्वे स्टेशनवर बॅगा तपासणीसाठी नेमणुकच कशी देण्यात आली हा देखील प्रश्न अन्नुत्तरीतच आहे. बेजबाबदार वर्तन, पोलिस दलाची प्रतिमा मलीन होईल असे वर्तन केल्याचा ठपका ठेवत 6 पोलिस कर्मचार्‍यांना निलंबीत करण्यात आले आहे.

 

निलंबीत करण्यात आलेल्यांपैकी दोघांवर यापुर्वी बॅग तपासणी दरम्यानच जबरी चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे. असे असताना त्यांची नेमणुक पुणे रेल्वे स्टेशनवर बॅग तपासणीसाठी केलीच कशी गेली हे सर्वात मोठे कोडे आहे. अति वरिष्ठांनी चौकशीचे आदेश दिल्यानंतर चौकशीअंती 6 पोलिस कर्मचार्‍यांना तात्काळ निलंबीत करण्यात आले आहे. पण, पुणे लोहमार्ग पोलिस स्टेशनमध्ये सध्या चांगलाच सावळा गोंधळ सुरू असल्याचे देखील समोर आले. लोहमार्ग पोलिस ठाण्यातील पोलिस अधिकार्‍यांना सध्या लोहमार्ग पोलिस स्टेशनचा प्रभारी अधिकारी कोण आहे हे देखील धड सांगता येत नाही, त्यांचा संपर्क क्रमांत तर लांबच. तशीच काहीशी अवस्था लोहमार्ग नियंत्रण कक्षाची देखील आहे. काही वरिष्ठ अधिकारी ट्रेनिंगसाठी आणि काही जण सुट्टीवर अथवा पदे रिक्त असल्याने अतिरिक्त पदभार अन्य अधिकार्‍यांकडे देण्यात आलेला आहे.
त्याबाबत देखील नियंत्रण कक्षातील पोलिसांना त्याबाबतच कल्पना नाही, त्यांचे संपर्क क्रमांक देखील माहिती नाहीत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पुणे रेल्वे स्टेशनवर दररोज लाखो प्रवाशी रेल्वेने प्रवास करण्यासाठी जातात. त्यापैकी अनेकांना वेगवेगळे अनुभव येतात. मात्र, समोर आलेला प्रकार हा पहिला नाही. यापुर्वी जून 2021 मध्ये भलतेच उद्योग केल्याप्रकरणी लोहमार्ग पोलिस ठाण्यातील तत्कालीन वरिष्ठ निरीक्षकासह 8 जणांना निलंबीत  करण्यात आले होते. त्यापैकी 7 जणांना कायमचा घरचा रस्ता (बडतर्फ) Police Dismissed दाखविण्यात आलेला आहे. असे असताना देखील अद्यापही अशा प्रकारचे भलतेच ‘उद्योग’ पुणे रेल्वे स्टेशनवर सुरू असल्याचे आज समोर आलेल्या घटनेवरून शिक्कामोर्तब होते. याबाबत अति वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी ठोस उपाय-योजना करणे गरजेचे आहे.

 

 

Web Title :  Pune Crime News | Robbery by police at Pune railway station! 5 lakh extortion? 6 policemen suspended, but…

 

हे देखील वाचा :

Nikita Takle-Khadsare | लोणावळाच्या ऑटो क्रॉस मध्ये फास्टर ड्रायव्हरसह 9 ट्रॉफी पटकविल्या; निकिता टकले खडसरेचे यश

Pune Chandani Chowk | चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला गती, 90 टक्के काम पूर्ण; उद्घाटनाची तारीख ठरली
S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एमईएस क्रिकेट क्लब संघ बाद फेरीत

 

Related Posts