IMPIMP

Pune Chandani Chowk | चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाला गती, 90 टक्के काम पूर्ण; उद्घाटनाची तारीख ठरली

by nagesh
Pune Chandani Chowk | the work of the flyover at chandni chowk is going well it will be inaugurated on maharashtra day

पुणे :सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Chandani Chowk | पुण्यातील बहुचर्चित चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या (Pune Chandani Chowk)
कामांना चांगलाच वेग आला आहे. या प्रकल्पाचे 90 टक्के काम पूर्ण झाले असून या पुलाची पाहणी करुन 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनी (Maharashtra
Day) उद्घाटन होणार असल्याची घोषणा नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी केली होती. त्यानंतर चांदणी चौकातील पुलाच्या कामाला वेग आला
होता. पुणेकर मागील अनेक महिन्यांपासून या उड्डाणपूलाच्या (Chandani Chowk Flyover) लोकर्पणाची वाट बघत होते. तो क्षण आता जवळ आला आहे.

 

चांदणी चौकातील (Pune Chandani Chowk) उड्डाणपुलाच्या उद्घाटनाच्या तारखेची घोषणा झाल्यानंतर कामे वेगाने करा, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Collector Dr. Rajesh Deshmukh) यांनी दिले होते. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाला वेग आला होता. काही दिवसांपूर्वी त्यांनी कामाची पाहणी केली होती. या उड्डाणपुलाचं गर्डर टाकण्याचे काम 15 ते 20 एप्रिल दरम्यान करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे काम सुरु करण्यापूर्वी या मार्गावरुन होणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे. या कामासोबत मुळशीच्या दिशेने जाणाऱ्या भुयारी मार्गाचे देखील काम वेगाने सुरु आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दोन दिवस वाहतुकीत बदल

चांदणी चौकातील उड्डाणपूल आणि रस्त्यांची 90 टक्के कामं पूर्ण झाली आहेत. नव्या उड्डाणपुलासाठी आवश्यक खांब उभारणीचे काम पूर्ण झालं आहे. 15 ते 20 एप्रिलदरम्यान गर्डर टाकण्याचे काम होणार आहे. त्यासाठी वाहतूक दोन दिवसांसाठी पर्यायी मार्गाने वळवण्याचे नियोजन NHAI कडून करण्यात येत आहे. बावधन ते सातारा आणि वेदभवन ते मुळशी या सेवा रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून 10 एप्रिलपासून हे रस्ते वाहतुकीसाठी खुले केले जाणार आहेत.

 

Web Title :  Pune Chandani Chowk | the work of the flyover at chandni chowk is going well it will be inaugurated on maharashtra day

 

हे देखील वाचा :

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एमईएस क्रिकेट क्लब संघ बाद फेरीत

Pune Covid Update | पुण्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ, रुग्णालयातील कोरोना वॉर्ड पुन्हा सुरु होणार

Maharashtra Politics News | आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत शिंदे गटाच्या महिला नेत्याचा खळबळजनक दावा, म्हणाल्या- ‘उद्धव ठाकरे भेटून गेले अन्…’

MP Navneet Rana | ‘उद्धव ठाकरे, तुम किस खेत की मूली हो’, भर सभेत नवनीत राणांचा हल्लाबोल

Chandrakant Patil | राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधी होणार?, चंद्रकांत पाटलांचे महत्त्वपूर्ण भाकीत

 

Related Posts