IMPIMP

Pune Crime News | डेक्कन पोलिस ठाण्यातच हॉटेल मालकानं घातली गुन्हे शाखेतील वरिष्ठ पोलिस निरीक्षकाशी हुज्जत, पुढं झालं असं काही…

by nagesh
Pune Crime News | The hotel owner had a fight with the senior police inspector of the crime branch in the Deccan police station, what happened next…

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | शहरात बहुतांश ठिकाणची हॉटेल, हातगाड्या रात्री 11 वाजता बंद होत असताना काही रस्त्यावरील टपर्‍या मध्यरात्रीपर्यंत पोलिसांच्याच आशिर्वादाने सुरु असतात. त्यापैकी डेक्कन येथील नदीपात्र हे एक ठिकाण. पण, या टपरीचालकांनी थेट वरिष्ठ पोलीस निरीक्षकाबरोबर हुज्जत घालून धमकाविण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

डेक्कन पोलिसांनी सचिन हरीभाऊ भगरे Sachin Haribhau Bhagre (वय ३३, रा. कबीर बाग, नारायण पेठ – Kabirbaug Narayan Peth) याला अटक केली आहे. याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट Sr PI Shrihari Bahirat (वय ५३) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात (Deecan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ११६/२३) दिली आहे. हा प्रकार नदीपात्रात रविवारी मध्यरात्री दीड वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट हे सध्या गुन्हे शाखेच्या युनिट ३ मध्ये
(Pune Police Crime Branch) कार्यरत आहेत. शनिवारी रात्री ते रात्रपाळीच्या कर्तव्यावर होते.
विश्रामबाग विभागात (Vishrambaug Police Division) गस्त घालत असताना त्यांचे पथक नदीपात्रात आले.
त्यावेळी मध्यरात्री दीड वाजता तेथील हॉटेल सदगुरु हे चालू असल्याचे दिसले. त्यांनी हॉटेल बंद करायला सांगितले.
तेव्हा सचिन भगरे याने त्यांच्याशी हुज्जत घातली. त्यामुळे पोलिसांनी त्याला घेऊन डेक्कन पोलीस ठाण्यात आणले.
तेथे सचिन भगरे याने फिर्यादी यांना काय करायचे ते कर असे एकेरी भाषेत बोलून फिर्यादींचा हात झटकून दिला. पोलीस अंमलदारांना ढकलून देऊन सरकारी कामात अडथळा आणल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक साळुंखे तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | The hotel owner had a fight with the senior police inspector of the
crime branch in the Deccan police station, what happened next…

Related Posts