IMPIMP

Pune Crime News | विहिरीत रिंग बसविताना मुरुम ढासळून चार मजूर गाडले; इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडीतील घटना

by sachinsitapure
Pune Crime News | while installing the ring in the well the pile collapsed and buried four laborers incident at mhsobawadi in indapur taluka

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | इंदापूर तालुक्यातील म्हसोबावाडी (Mhsobawadi Indapur) येथील शेतातील विहिरीच्या रिंग बांधकाम करताना रिंग पडून व मुरुम ढासळल्याने या दुर्घटनेत चार मजूर गाडले गेल्याची भिती व्यक्त केली जात आहे. कामगार रात्री घरी न आल्याने चौकशी केल्यानंतर बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला आहे. ही विहिर खूप खोल असल्याने बचाव कार्याला वेळ लागत आहे. एनडीआरएफचे पथकही (NDRF Team) दाखल झाले आहे. (Pune Crime News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

विजय अंबादास क्षीरसागर (रा. सणसर, ता. इंदापूर) यांच्या मौजे म्हसोबावाडी गावाचे हद्दीत कवडे वस्तीलगत मंगळवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सोमनाथ लक्ष्मण गायकवाड Somnath Laxman Gaikwad (वय ३५), जावेद अकबर मुलानी Javed Akbar Mulani (वय ३५), परशुराम बन्सीलाल चव्हाण Parshuram Bansilal Chavan (वय ३०) मनोज मारुती सावंत Manoj Maruti Sawant (वय ४०, सर्व रा. बेलवाडी, ता. इंदापूर) हे गाढले गेले आहेत. (Pune Crime News)

 

गायकवाड यांच्या शेतात विहिरीचे रिंग बसविण्याचे काम सुरु होते.
ही विहीर १२० फुट व्यासाची गोल व १२७ फुट खोल आहे.
तिच्या बाजूने रिंग बसवण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले होते.
शेवटच्या टप्प्याचे काम सुरु असताना एका बाजूचा सिमेंटची रिंग व त्याबरोबर मुरुम, माती ढासळली.
त्यात खाली काम करीत असलेले सर्व चारही कामगार गाडले गेले.
ही घटना आज सकाळी समजली. या घटनेची माहिती मिळताच
अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे (Additional Superintendent of Police Anand Bhoite),
उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे (Sub Divisional Police Officer Ganesh Ingle),
तहसिलदार श्रीकांत पाटील (Tehsildar Shrikant Patil) घटनास्थळी पोहचले.
पोकलेन मशीन लावून विहिरीचा ढासळलेला मुरुम काढण्याचे काम सुरु करण्यात आले आहेत.

Web Title :  Pune Crime News | while installing the ring in the well the pile collapsed and buried four laborers incident at mhsobawadi in indapur taluka

हे देखील वाचा

Related Posts