IMPIMP

Pune Crime News | येरवडा पोलिस स्टेशन – येरवडा कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराला घेण्यास आलेल्यावर हल्ला; येरवड्यातील घटना

by nagesh
Pune Crime News | Yerawada Police Station – Attack on those who came to pick up the escaped convict from Yerawada Jail; incident in Yerwada

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | पिंपरीतील दोन टोळ्यांमधील वर्चस्वातून वाद होत असतानाच येरवडा कारागृहातून (Yerwada Jail) सुटलेल्या गुंडाला घेऊन जाण्यासाठी आलेल्यांवर तिघा गुंडांनी हत्याराने वार करुन जबर जखमी केले. (Pune Crime News)

याप्रकरणी वैभव हुलीगाप्पा बुडगल (वय २२, रा. वल्लभनगर, पिंपरी) याने येरवडा पोलीस ठाण्यात (Yerwada Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार कल्ल्या ऊर्फ सुरज जाधव Kallya alias Suraj Jadhav (रा. वल्लभनगर, पिंपरी – Vallabhnagar Pimpri) याच्यासह त्याच्या इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. सुरज जाधव हा सराईत गुन्हेगार (Criminal) असून त्याच्यावर खूनाचा आरोप आहे.

हा प्रकार येरवड्यातील गोल्फ क्लब चौकात (Golf Club Chowk Yerawada) ७ जून रोजी रात्री आठ वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी याचा मित्र सुशांत जाधव (रा. विठ्ठलनगर, पिंपरी) याचे आणि
सुरज जाधव हे दोघे एकाच भागात रहात असून दोघांमध्ये दुश्मनी आहे.
सुशांत जाधव याला जामीन मिळाल्याने त्याची येरवडा कारागृहातून सुटका झाली होती.
त्याला घेण्यासाठी फिर्यादी, त्यांचे मित्र अजय टाकळकर, अयुश कांबळे हे येरवडा येथे गेले होते.
सुरज जाधव याला भेटून ते रात्री पुन्हा पिंपरीला जाण्यास निघाले.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

मोटारसायकलवरुन गोल्फ क्लब चौकातून जात असताना मोटारसायकलवरुन सुरज जाधव व त्याचे दोन साथीदार आले. त्यांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना थांबवून सुशांतला सोडवायला येता काय असे म्हणून शिवीगाळ करुन लोखंडी हत्याराने फिर्यादीच्या उजव्या पायावर मारुन फ्रॅक्चर करुन गंभीर जखमी केले. त्यांच्या दोन्ही मित्रांना हाताने मारहाण (Beating) केली. फिर्यादी यांनी उपचार घेतल्यानंतर आता फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक डोंबाळे (PSI Dombale) तपास करीत आहेत.

Web Title : Pune Crime News | Yerawada Police Station – Attack on those who came to pick up the
escaped convict from Yerawada Jail; incident in Yerwada

Related Posts