IMPIMP

Pune Crime News | लोहियानगरमध्ये तरुणाचा गळा दाबून केला खून; तीन ते चार दिवसांपूर्वी खून केल्याचा संशय

by sachinsitapure
Pune Crime News | youth strangled to death in lohianagar suspected of murder three to four days ago

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime News | लोहियानगर परिसरात एका तरुणाचा गळा दाबून खून (Murder) करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे (Pune Crime News). या तरुणाची ओळख अद्याप पटलेली नाही. हा तरुण अंदाजे ३५ ते ४० वर्षाचा असून त्याने लाल रंगाचा टीशर्ट आणि जीन पँट परिधान केली आहे. खूनाची घटना ही तीन ते चार दिवसांपूर्वी घडली असल्याचा मृतदेहाच्या अवस्थेवरुन संशय व्यक्त केला जात आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

नेहरू रोडवरील महापालिकेच्या सोनवणे हॉस्पिटलसमोर (PMC Sonwane Hospital) जुने गाळे आहेत. महापालिकेकडून हे गाळे बांधण्यात आले असले तरी या गाळ्यांचा वापर सध्या कोणी करत नाहीत. त्यामुळे गाळ्यांचा आवारात कचरा तसेच टाकाऊ वस्तू टाकण्यात आल्या आहेत. तेथेच मोकळ्या जागेत जुना सोफा ठेवण्यात आला आहे. या सोफ्यावर एका तरुणाचा मृतदेह (Dead Body) ठेवण्यात आला होता. शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास पोलिस नियंत्रण कक्षाला (Pune Police Control Room) नागरिकाने याची माहिती दिली. खडक पोलीस ठाण्याचे (Khadak Police Station) कर्मचारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी हा मृतदेह शविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पाठविला. शवविच्छेदनात गळा दाबल्याने मृत्यु झाल्याचा सांगण्यात आले. त्यानुसार पोलिसांनी खूनाचा (Pune Murder Case) गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime News)

या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. हा तरुण तेथे कसा आला.
त्याला दुसरीकडे मारुन त्याचा मृतदेह येथे आणून टाकला की येथेच त्याला मारुन टाकण्यात आले.
खूनामागील नेमके कारण काय याचा पोलीस निरीक्षक संपतराव राऊत (PI Sampatrao Raut) अधिक तपास करीत आहेत.

Web Title :  Pune Crime News | youth strangled to death in lohianagar suspected of murder three to four days ago

Pune Shramik Patrakar Sangh | पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी दैनिक पुढारीचे
पांडुरंग सांडभोर तर खजिनदारपदी दैनिक प्रभातच्या अंजली खमितकर यांची निवड

Vijay Choudhary | ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी झाले विश्व विजेता;
वर्ल्ड पोलिस अँड फायर गेम्स 2023 मध्ये भारतासाठी मिळवले सुवर्णपदक

Related Posts