IMPIMP

Pune Crime | पुण्यातील गणेश पेठ पोलीस चौकीसमोर एकाच्या डोक्यात फरशी घालून खून

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  पुण्यातील (Pune Crime) लक्ष्मी रस्त्यावर (Laxmi Road) एका मद्यपीचा डोक्यात फरशी घालून खून (Murder) करण्यात आला. ही घटना शुक्रवारी रात्री पुण्यातील (Pune Crime) गणेश पेठ पोलीस चौकी (ganesh peth police chowki) समोर मध्यरात्री घडली आहे. मयत हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असून या प्रकरणी पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

सूरज अनंत कामथे (वय-32 रा. गणेश पेठ) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी त्याची बहिण स्नेहल काची (वय-33 रा. शुक्रवार पेठ) हिने फरसाखाना पोलीस ठाण्यात (faraskhana police station) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा (Pune Crime) दाखल केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत सुरज कामथे याची गुन्हेगारी पार्श्वभूमी (Criminal background) आहे. त्याच्यावर चोरीचे (Theft) गुन्हे दाखल असून त्याला दारुचे व्यसन आहे.
मध्यरात्री एकच्या सुमरास गणेश पेठ पोलीस चौकीसमोर पीएमपी थांब्याजवळ (PMP stop) कामठे याच्या डोक्यात फरशी घालून खून करण्यात आला.
सूरज हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. या घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी तात्काळ घनास्थळी धाव घेतली.
त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

सूरज कामथे याचा खून कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. पोलिसांनी संशयावरुन एकाला ताब्यात घेतले आहे.
फरासखाना पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहेत. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत पाटील (API Abhijeet Patil) करीत आहेत.

 

Web Title : Pune Crime | One killed in front of Ganesh Peth police chowki of faraskhana police station in pune

 

हे देखील वाचा :

High Court | हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय ! ‘दलित व्यक्तीने क्रॉस घातल्यास किंवा चर्चमध्ये गेल्यास जात प्रमाणपत्र…’

Pune Crime | कारागृहातून जामीनावर सुटलेल्या सराईत गुन्हेगाराची पुण्यात रॅली, 14 जणांवर FIR

Mumbai Police Cyber Cell | मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडून CBI चे संचालक सुबोध कुमार जयस्वाल यांना ‘समन्स’

 

Related Posts