IMPIMP

Pune Crime | बँकेत खोटे सोने गहाण ठेवून कर्ज घेणाऱ्या आरोपींचा अटकपूर्व जामीन मंजूर

by nagesh
Pune Crime News | The district and sessions court granted bail to the accused in the murder even before the charge sheet was filed

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Crime | खोटे सोने बँकेत गहाण ठेवून लाखो रुपयांचे कर्ज (Gold Loan) घेतल्याचा प्रकार पुण्यातील अहमदनगर शहर सहकारी बँकेत (Ahmednagar City Cooperative Bank) उघडकीस आला आहे. याप्रकरणी बँकेच्या कोथरुड शाखाधिकारी यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी कर्जदार आणि बँकेचे गोल्ड व्हॅल्युअर (Gold Valuer) यांच्यावर गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे. या गुन्ह्यातील दोन आरोपींचा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयंत राजे (Sessions Court Judge Jayant Raje) यांनी अटकपूर्व जामीन मंजूर (Anticipatory Bail Granted) केला असल्याची माहिती अ‍ॅड. प्रसाद निकम (Adv. Prasad Nikam) यांनी दिली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याबाबत बँक अधिकारी मंदार सुरेश सुभेदार यांनी कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी (Pune Police) बँक व्हॅल्युअर अजित कुलकर्णी कर्जदार मारुती शिवाजी सुर्यवंशी, सुनिल रघुनाथ कदम, वैजयंती सुनिल कदम, केतन विलास अमराळे व सनी देविदास बलकवडे यांच्यावर आयपीसी 420, 468, 471, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. मारुती सुर्यवंशी आणि केतन अमराळे यांनी अ‍ॅड. प्रसाद निकम यांच्या मार्फत न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. (Pune Crime)

 

अ‍ॅड. प्रसाद निकम यांनी न्यायालयात युक्तिवाद (Argument) करताना सांगितले की,
गुन्हा दाखल करण्यात आलेले लोक हे गरीब आहेत. बँकेचे व्हॅल्युअर अजित कुलकर्णी
(Bank Valuer Ajit Kulkarni) यांनी स्वत:च्या फायद्यासाठी या लोकांचा उपयोग करुन घेतला आहे.
सुर्यवंशी आणि अमराळे यांच्यासह इतर अनेकांच्या नावावर बँकेत सोने तारण ठेऊन कर्ज घेतले आहे.
याबाबत फेब्रुवारी 2022 मध्ये 40 जणांनी स्वत: पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
अजित कुलकर्णी याने कर्जदार यांना कर्जाचे हप्ते भरतो असे सांगून त्यांच्या नावावर कर्ज घेतले.
तसेच कर्जाची रक्कम स्वत:च्या खात्यात जमा करुन घेतली.
महत्त्वाचे म्हणजे याच लोकांनी बँकेला फसवणूक (Fraud) झाल्याचे सांगितले होते.
बँकेत सोने ठेवल्यानंतर बँकेने कर्जदार यांना रिसीट देखील दिली आहे.
त्यामुळे या गुन्ह्यातील खरा आरोपी हा अजित कुलकर्णी असून यामध्ये अर्जदार यांचा काहीही दोष
नसल्याचा युक्तिवाद अ‍ॅड. निकम यांनी केला. न्यायालयाने अ‍ॅड. प्रसाद निकम यांचा युक्तिवाद आणि बँकेने
सोने तारण ठेवल्यानंतर दिलेली रिसीट पाहून मारुती सुर्यवंशी आणि केतन अमराळे यांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला.

 

या प्रकरणात अ‍ॅड. प्रसाद निकम यांना अ‍ॅड. तन्मय देव (Adv.Tanmay S Deo), अ‍ॅड. मन्सूर तांबोळी (Adv.Mansoor Tamboli) आणि अ‍ॅड. शुभम बोबडे (Adv.Shubham Bobade) यांनी सहकार्य केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Crime | Pre-arrest bail granted to the accused who took loans by pledging fake gold in the bank

 

हे देखील वाचा :

Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीची ‘ती’ प्रतिक्रिया चर्चेत ; पाकिस्तानी चाहता झाला खूश

Sunny Leone | अभिनेत्री सनी लिओनीची ‘ती’ प्रतिक्रिया चर्चेत ; पाकिस्तानी चाहता झाला खूश

Ravi Rana | उमेश कोल्हे हत्या प्रकरणात रवी राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप, शंभूराज देसाईंनी दिले चौकशीचे आदेश

Aditi Tatkare | सभागृहात सत्ताधारी पक्षाचे लोकच कामकाजात खोडा घालत आहेत – अदिती तटकरे

 

Related Posts