IMPIMP

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जूना पूल पाडण्यासाठी आणखी 8 दिवस लागणार?

by nagesh
Pune Chandani Chowk Bridge Demolition | The Chandni Chowk bridge will be demolished between October 1 and 2 at midnight

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील पूल पाडण्याआधीची पूर्वतयारी संबंधित खासगी कंपनीकडून करण्यात अंतिम टप्प्यात आहे. मात्र, या ठिकाणच्या विविध सेवावाहिन्या स्थलांतर करण्याचे काम रखडले आहे. परिणामी जूना पूल पाडण्याला आणखी आठ दिवस विलंब लागण्याची शक्यता आहे. (Pune Chandani Chowk Bridge Demolition)

 

पुणे महापालिकेकडून Pune Municipal Corporation त्यांच्याकडील बहुतांशी सेवावाहिन्या काढण्यात आल्या आहेत. मात्र, अन्य सेवावाहिन्या स्थलांतरित करण्याबाबत महापालिकेलाच विनंती करण्यात आली आहे. या कामासाठी विलंब होत आहे. तर, दुसरीकडे जोवर सेवावाहिन्या स्थलांतरित करण्यात येत नाहीत, तोवर पूल पाडता येणार नसल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (नॅशनल हायवेज ॲथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

या सेवावाहिन्या स्थलांतरित करून प्रत्यक्ष पूल पाडण्यासाठी आणखी आठ दिवस लागण्याची शक्यता एनएचएआयकडून व्यक्त करण्यात येत आहे. तसेच पुलाजवळील परिसरातील स्थानिकांचे स्थलांतर, पूल पाडल्यानंतर नऊ ते दहा तासांत वाहतूक थांबविणे, पूल कोसळल्यानंतर पडलेला राडारोडा काढण्यासाठीची व्यवस्था, त्यासाठी लागणारे मनुष्यबळ आणि वाहने आदींचे प्रामुख्याने नियोजन महत्वाचे आहे.
याशिवाय पूल पाडताना पाऊस नसणे आवश्यक आहे. अन्यथा पडणारा ओला राडारोडा उचलणे मोठे जिकरिचे काम आहे.
या सर्व कारणांमुळे प्रत्यक्ष पूल पाडण्यास आणखी आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Pune Chandani Chowk Bridge Demolition | Will it take another 8 days to demolish Chandni Chowk old bridge?

 

हे देखील वाचा :

Mumbai Pune Express Way वरील प्रवास महागणार? एक्सप्रेसवेवरील टोल मध्ये मोठी वाढ होणार

Sharad Pawar | काय झाडं, काय हवा… एखाद्या वेळी ठीक; पण…, शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान!

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदेंचा अजित पवारांना धक्का, बारामतीमधील प्रस्तावित प्रकल्प रद्द

 

Related Posts