IMPIMP

Pune Crime | रूमवर पोरी-पोरांना आणतो, धंदा करतो? सहायक पोलीस निरीक्षक (API) असल्याची बतावणी करून कॉलेज विद्यार्थ्याची फसवणूक; भामटा गुन्हे शाखेच्या जाळ्यात

by nagesh
Pune Crime | Bringing children to the room, doing business? Cheating a college student by pretending to be an Assistant Police Inspector (API); In the net of Bhamta Crime Branch

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | सहायक पोलीस निरीक्षक (API) असल्याची बतावणी करुन कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची (College Student) आर्थिक फसवणूक (Cheating) केल्याचा प्रकार घडला होता. या गुन्ह्यातील आरोपीला गुन्हे शाखा युनिट तीनच्या (Pune Police Crime Branch Unit 3) पथकाने अटक (Arrest) केली आहे. ही कारवाई (Pune Crime) गुरुवारी (दि.15) दुपारी अडीचच्या सुमारास धनकवडी (Dhankawadi) शेवटचा बस स्टॉप येथे करण्यात आली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

शुभम अशोक माने Shubham Ashok Mane (वय-22 रा. भवानी पार्क बिल्डींग, मंदार सोसायटी, धनकवडी सध्या रा. मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपी शुभम माने याच्यावर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) आयपीसी 420, 170, 504 नुसार गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सिहंगड पोलीस आणि युनिट तीनच्या पथकाकडून करण्यात येत होता. (Pune Crime)

 

आरोपीने कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला आपण सहायक पोलीस निरीक्षक (Assistant Police Inspector) असल्याचे सांगितले. रूमवर पोरी-पोरांना आणतो, धंदा करतो? अशी विद्यार्थ्याला धमकी (Threat) देऊन त्याच्याकडून पैसे घेऊन आर्थिक फसवणूक केली. गुन्ह्याचा तपास करत असताना युनिट तीनच्या पोलिसांनी (Pune Police) घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यावेळी आरोपीने गुन्ह्यात वापरलेल्या ज्युपिटर गाडीचा (एमएच 12 एनएस 1871) क्रमांक पोलिसांनी मिळाला.

 

पोलिसांनी गाडीच्या नंबरवरुन गाडी मालकाच्या घराचा पत्ता शोधला. आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलीस जात असताना आरोपी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीवरुन जात असल्याचे आढळून आले. धनकवडी शेवटच्या बस स्टॉपजवळ पोलिसांनी त्यांची गाडी आडवी घालून आरोपीला ताब्यात घेतले.

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (Joint CP Sandeep Karnik),
अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे (Addl CP Ramnath Pokale),
पोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे (DCP Srinivas Ghadge),
सहायक पोलीस आयुक्त गजानन टोम्पे (ACP Gajanan Tompe) यांच्या मार्गदर्शनाखाली
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिता मोरे (Senior Police Inspector Anita More),
सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष क्षीरसागर (ASI Santosh Kshirsagar)
पोलीस अंमलदार रामदास गोणते, शरद वाकसे, सुजित पवार, संजीव कळंबे, सोनम नेवसे, ज्ञानेश्वर चित्ते,
प्रताप पडवाळ, सतिश कत्राळे, राकेश टेकावडे, साईनाथ पाटील, गणेश शिंदे यांच्या पथकाने केली.

 

Web Title:  Pune Crime | Bringing children to the room, doing business? Cheating a college student by pretending to be an Assistant Police Inspector (API); In the net of Bhamta Crime Branch

 

हे देखील वाचा :

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील जूना पूल पाडण्यासाठी आणखी 8 दिवस लागणार?

Mumbai Pune Express Way वरील प्रवास महागणार? एक्सप्रेसवेवरील टोल मध्ये मोठी वाढ होणार

Sharad Pawar | काय झाडं, काय हवा… एखाद्या वेळी ठीक; पण…, शरद पवारांनी सत्ताधारी आणि विरोधकांचेही टोचले कान!

 

Related Posts