IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! शारीरिक संबंध ठेवत नसल्याच्या रागातून कर्वे रोडवरील हॉस्टेलवर जाऊन तरुणीला बेदम मारहाण, विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध FIR

by nagesh
Pune Pimpri Chinchwad Crime | A woman was molested by making obscene comments, and her husband was brutally beaten when he asked for a jab; Incidents in Dehu Road area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुण्यात महिलांवर अत्याचार होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर (Minor Girl) लैंगिक अत्याचार (Sexual Harassment) झाल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच एका 23 वर्षाच्या तरुणीचा हॉस्टेल पर्यंत (Girls Hostel In Pune) पाठलाग करुन शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवत नसल्याच्या रागातून लाथा – बुक्क्यांनी मारहाण (Beating) करुन विनयभंग (Molestation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार पुण्यातील कर्वे रोड (Karve Road) परिसरात रविवारी (दि.27) दुपारी साडे बारा ते दीड या दरम्यान घडला आहे (Pune Crime). पोलिसांनी (Pune Police) आरोपीवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याबाबत 23 वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

त्यानुसार पोलिसांनी बालेवाडी (Balewadi) येथे राहणाऱ्या 29 वर्षाच्या तरुणावर IPC 354, 354 (A), 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी हे सोलापूर जिल्ह्यातील (Solapur District) असून एकाच गावचे रहिवासी आहेत. त्यामुळे ते एकमेकांच्या ओळखीचे असून ते मित्र आहेत. आरोपी हा एका खासगी कंपनीत कामाला आहे. दरम्यान, आरोपीचे लग्न झाल्यापासून पीडित तरुणीने आरोपीसोबत कोणत्याही प्रकारचे संबंध ठेवले नाहीत. (Pune Crime)

 

आरोपीने पीडित तरुणीचा वारंवार पाठलाग करुन तिला त्रास दिला.
रविवारी पीडित तरुणी राहत असलेल्या हॉस्टेलवर आरोपी गेला.
त्या ठिकाणी त्याने बोलत का नाही असे म्हणून शारीरिक संबंध ठेवत नसल्याच्या रागातून तरुणीला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
तसेच लाथा – बुक्क्यांनी बेदम मारहाण करुन तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
पीडित तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरुद्ध तक्रार दिली.
पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक कवटीकवार (PSI Meera Kavatikwar) करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Shocking FIR against a young man who went to a hostel on Karve Road in a fit of rage and beat up a young woman Molestation Case

 

 

हे देखील वाचा :

IPS Saurabh Tripathi | निलंबित IPS अधिकारी सौरभ त्रिपाठीला न्यायालयाचा दणका; जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | सिंहगड रोड परिसरात तरुणाला बेदम मारहाण, 4 जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात FIR

Pune Crime | नर्‍हे येथील भुमकर चौकातील पानटपरी चालकाला पाईपाने मारहाण, तोडफोड करणाऱ्या तिघांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात FIR

 

Related Posts