IMPIMP

Pune Crime | सिंहगड रोड परिसरात तरुणाला बेदम मारहाण, 4 जणांवर दत्तवाडी पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime News | Pune-Rasta Peth Crime News: Shopkeepers beaten up for extortion, four arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | गणपती विसर्जनादिवशी (Ganpati Immersion) झालेल्या वादातून एका तरुणाला लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण (Beating) केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) सिंहगड रोड (Sinhagad Road) परिसरात घडली आहे. ही घटना सिंहगड रोड येथील चैतन्य हॉस्पिटल समोर सोमवारी (दि. 28) रात्री दहाच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) चार जणांवर गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

राहुल प्रकाश थोरात Rahul Prakash Thorat (वय – 23 रा. दांडेकर पुल, सिंहगड रोड, पुणे) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने दत्तवाडी पोलीस ठाण्यात (Dattawadi Police Station) मंगळवारी (दि.29) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भावड्या सकट, सनी पवार, वैभ्या, पऱ्या कांबळे (सर्व रा. एस. आर. ए. स्कीम (S.R.A. Skim), म्हाडा कॉलनी, रामटेकडी, हडपसर – Hadapsar) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल थोरात आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.
सोमवारी रात्री फिर्यादी हे घराबाहेर बसले असताना आरोपी त्या ठिकाणी आले.
आरोपींनी गणपती विसर्जन दिवशी झालेल्या वादाचा राग मनात धरुन राहुलला दगडाने आणि लाकडी दांडक्याने मारहाण केली. ही भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी यांचे वडिल आले असता आरोपींनी त्यांच्याही हातावर लाकडी दांडक्याने मारुन जखमी केले. जखमी (Injured) राहुल थोरात याने मंगळवारी दत्तवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध फिर्याद दिली. पुढील तपास दत्तवाडी पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | Young man beaten to death in Sinhagad Road area FIR lodged against 4 persons at Dattawadi Police Station

 

हे देखील वाचा :

Pune Crime | नर्‍हे येथील भुमकर चौकातील पानटपरी चालकाला पाईपाने मारहाण, तोडफोड करणाऱ्या तिघांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात FIR

Alia Bhatt Brand Valuation Report | सर्वात महागड्या कलाकारांमध्ये अभिनेत्री अलिया भट्ट पूढे, सुपरस्टार शाहरूख – सलमानसुद्धा पाडलं मागं…

Yami Gautam Oops Moment | यामी गौतमच्या उघड्या जॅकेटमुळं ती झाली Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ

IPS Sanjay Pandey | ‘मुंबईतील नागरिक हे गुंडगिरीमुळे कमी अन्…’; पोलीस आयुक्त संजय पांडेंनी सांगितली मुंबईकरांची खरी समस्या !

 

Related Posts