IMPIMP

Pune Crime | नर्‍हे येथील भुमकर चौकातील पानटपरी चालकाला पाईपाने मारहाण, तोडफोड करणाऱ्या तिघांवर सिंहगड रोड पोलिस ठाण्यात FIR

by nagesh
Chhatrapati Sambhajinagar Crime News | lodge owner and his son were brutally beaten up by mob for not allowing them to go to the toilet vaizapur

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | एकमेकांकडे पाहण्यावरुन एका पानटपरी चालकाला लोखंडी पाईपाने बेदम मारहाण (Beating) करुन जखमी केले. तसेच पानटपरीची तोडफोड करुन नुकसान केल्याची घटना पुण्यातील (Pune Crime) नऱ्हे (Narhe) येथील भुमकर चौकात (Bhumkar Chowk) रविवारी (दि.27) रात्री साडे दहाच्या सुमारास घडली आहे. याबाबत जखमी (Injured) झालेल्या पानटपरी चालकाने मंगळवारी (दि. 29) सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) तक्रार दिली आहे. पोलिसांनी (Pune Police) तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

विवेककुमार नन्नेलाल वर्मा Vivek Kumar Nannelal Verma (वय – 21 रा. सिताई कॉर्नर, भुमकर चौक, नऱ्हे) असे जखमी झालेल्या पानटपरी चालकाचे नाव असून त्याने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी भिम उर्फ भिमशा चव्हाण (Bhim alias Bhimsha Chavan), व्यंकटेश पिनवलकर (Venkatesh Pinwalkar), किरण शिंदे (Kiran Shinde) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी हे तोंडओळखीचे आहे.
रविवारी रात्री फिर्यादी त्यांच्या मातोश्री पान शॉप मध्ये काम करत होते.
त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आले. भिमशा चव्हाण याने फिर्यादी यांना ‘तु माझ्याकडे असा का पाहतो’ असे म्हणत वाद घालून शिवीगाळ केली.
तसेच लोखंडी पाईपने पानटपरीचे काऊंटर (Counter), शटर (Shutter) आणि एलईडी टिव्हीवर (LED TV) मारुन तोडफोड केली.
तसेच फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी पाईप मारुन जखमी केले. पुढील तपास पोलीस हवालदार गवळी (Police Constable Gawli) करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | FIR filed at Sinhagad Road Police Station against three persons Narhe Bhumkar Chowk Incident

 

हे देखील वाचा :

Alia Bhatt Brand Valuation Report | सर्वात महागड्या कलाकारांमध्ये अभिनेत्री अलिया भट्ट पूढे, सुपरस्टार शाहरूख – सलमानसुद्धा पाडलं मागं…

Yami Gautam Oops Moment | यामी गौतमच्या उघड्या जॅकेटमुळं ती झाली Oops Moment ची शिकार, पाहा व्हायरल व्हिडिओ

IPS Sanjay Pandey | ‘मुंबईतील नागरिक हे गुंडगिरीमुळे कमी अन्…’; पोलीस आयुक्त संजय पांडेंनी सांगितली मुंबईकरांची खरी समस्या !

 

Related Posts