IMPIMP

Pune Crime | भावाच्या त्रासाला कंटाळून तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या; विश्रांतवाडी परिसरातील घटना

by nagesh
Nanded Crime | nanaded student suicide of 10 year old student of tribal ashram school in nanded crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – Pune Crime | हिश्याची जमीन विकून त्याचा मोबदला न देता खोट्या तक्रारी केल्याने होणार्‍या त्रासाला कंटाळून
एका तरुणाने गळफास (Suicide In Pune) घेऊन आत्महत्या केली. महादेव मधुकर कोंद्रे (वय ४०, रा. माळीनगर, बिजवडी पवार वस्ती, ता.
माळसिरस, जि. सोलापूर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. (Pune Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी प्रमिला महादेव कोंद्रे (वय ४०) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात (Vishrantwadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. २४४/२२) दिली
आहे. त्यावरुन पोलिसांनी वसंत अनंत कोेंद्रे Vasant Anant Kondre (रा. हडपसर – Hadapsar) व संभाजी जगन्नाथ कणसे Sambhaji Jagannath
Kanse (रा. धनकवडी – Dhankawadi) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रमिला कोंद्रे यांचे वसंत कोंद्रे हे दीर आहेत.
वसंत व त्यांचा मित्र संभाजी कणसे यांनी संगनमत करुन गोड बोलून महादेव कोंद्रे यांच्या हिश्याची जमीन विकली.
त्यांचा मोबदला म्हणून ९९ लाख रुपयांचा धनादेश दिला. परंतु हा धनादेश खात्यात पैसे नसल्याने परत आला.
याबाबत महादेव कोंद्रे यांनी विचारणा केली. तरीही त्यांनी पैसे न दिल्याने त्यांनी कोर्टात केस टाकतो, असे सांगितले.
त्यावर राग येऊन दोघांनी महादेव कोंद्रे यांच्याविरुद्ध खोट्या तक्रारी केल्या.
आरोपींच्या या त्रासाला कंटाळून महादेव कोंद्रे यांनी विश्रांतवाडी येथील भागीरथी सोसायटीमध्ये ११ ऑगस्ट रोजी
दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सहायक पोलीस निरीक्षक माळी (API Mali) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Tired of his brother’s troubles, the young man committed suicide by hanging himself; Incidents in Vishrantwadi area

 

हे देखील वाचा :

Pune Water Supply | पुणे शहराला वर्षभर पुरणाऱ्या पाण्याचा मुठा नदीत विसर्ग

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौकातील वाहतूक अचानक वळविल्याने पुणेकरांना मनस्ताप

 

 

 

Related Posts