IMPIMP

Pune Crime | ‘आम्ही कात्रजचे भाई आहोत’, पुण्यात भरदिवसा टोळक्याचा धुडगूस, कात्रज चौकातील गाड्यांची केली तोडफोड

by nagesh
Pune Crime | vehicles vandalized at katraj chowk in pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | कात्रज (Katraj) ते मुंबई (Mumbai) प्रवासी (Passenger) वाहतूक करायची असेल तर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता (Instalment) द्यावा लागेल, आम्ही कात्रजचे भाई आहोत असे म्हणत हप्ता देण्यास नकार देणाऱ्या चालकाच्या गाडीची तोडफोड (Pune Crime) केली. भरदिवसा कात्रज चौकात (Katraj Chowk) घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार मुंबई-पुणे महामार्गावरील (Mumbai-Pune Highway) ICICI बँकेसमोर घडला. याबाबत पोलिसांनी (Pune Police) तिघांविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

इस्माईल मकानदार, तौशीफ उर्फ चुहा आणि त्याचा आणखी एक साथीदार यांनी गाड्यांची तोडफोड (Vehicles Vandalized) केली. त्यांच्या विरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात (Bharati Vidyapeeth Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कारचालक प्रवीण दिनकर गायकवाड (Praveen Dinkar Gaikwad) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.7) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. महत्वाचे म्हणजे पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर हा प्रकार घडला आहे. त्यामुळे पोलिसांचा गुन्हेगारांवर (Criminals) वचक राहिला आहे की नाही असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. (Pune Crime)

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-पुणे महामार्गावर फिर्यादी हे ईरटीका कार (Ertica Car) घेऊन प्रवासी वाहतूक करण्यासाठी नंबरला थांबले होते. त्यावेळी आरोपी हातात लाकडी बांबू घेऊन त्यांच्याजवळ आले. आम्ही कात्रजचे भाई आहोत, तुम्ही आमच्या परवानगीशिवाय प्रवासी वाहतूक कशी करता. जर तुम्हाला कात्रज ते मुंबई प्रवासी वाहतूक करायची असेल तर महिन्याला दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, अशी मागणी केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

फिर्यादी यांनी हप्ता देण्यास नकार दिला असता फिर्यादी व त्यांच्या मित्रांना आरोपींनी शिवीगाळ केली.
तसेच हातातील लाकडी बांबूने इरटीका कारच्या काचा फोडून 40 हजार रुपयांचे नुकसान करुन फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याची धमकी (Threats to Kill) दिली.
पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | vehicles vandalized at katraj chowk in pune

 

हे देखील वाचा :

Raj Thackeray | ठरलं ! राज ठाकरेंची ठाण्यात ‘उत्तर’ सभा, मनसे अध्यक्ष काय बोलणार याकडं संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष

Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणीत वाढ? रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांकडून समन्स

Protein Shake Side Effects | प्रोटीन शेक पिण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 9 गोष्टी, अन्यथा पडू शकते महागात

Black Raisin Water Benefits For Women’s | महिलांची ही एक पॉवर वाढवते काळ्या मनुकांचे पाणी, लेडीजच्या अनेक समस्यांवर अचूक उपाय

 

Related Posts