IMPIMP

Raj Thackeray | ठरलं ! राज ठाकरेंची ठाण्यात ‘उत्तर’ सभा, मनसे अध्यक्ष काय बोलणार याकडं संपुर्ण महाराष्ट्राचं लक्ष

by nagesh
MNS Chief Raj Thackeray | police take objection to some provocative statements of raj thackeray aurangabad sabha

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Raj Thackeray | मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या 9 एप्रिल रोजीच्या ठाण्यातील (Thane) जाहीर सभेला पोलिसांनी परवानगी नाकारल्याने आता ही उत्तर सभा 12 एप्रिल रोजी होणार आहे. अशी माहिती मनसे नेत्यांनी ठाण्यात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मनसे नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारकडून (Mahavikas Aghadi Government) केल्या जाणाऱ्या अडवणुकीचा पाढा वाचला. ह्यांनी घातलेला गोंधळ चालतो आणि मनसेच्या सभेला परवानगी द्यायची नाही. ही कसली लोकशाही असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी करून येत्या 12 एप्रिलला या सर्वाची उत्तरक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे करतील. असा गर्भित इशारा पत्रकार परिषदेच्या माध्यमातुन देण्यात आला. दरम्यान, तब्बल 10 तास खलबते केल्यानंतर पोलिसांनी सभेच्या ठिकाणाबाबतचे मौन सोडुन अखेर 12 एप्रिल रोजी गडकरी रंगायतन नजीक डॉ. मुस रस्त्यावरच (Dr. Mus Roads) सभेला परवानगी दिल्याचे समज पत्र मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांना सुपूर्द केले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

मराठीच्या मुद्यासोबतच ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यात मशिदीवरील भोंगे काढण्याचे आणि मदरशांवर धाडी टाकण्याची भूमिका मांडुन महाविकास आघाडीला अल्टिमेटम दिला होता. त्यानंतर या वक्तव्याचे सर्वत्र पडसाद उमटले. मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी राज ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठवली. याला मनसेचे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जोरदार प्रत्युत्तर देत आव्हाड यांच्या मुस्लीम प्रेमावर टीका केली होती. महाआघाडीतील इतर नेत्यांसह वंचित आघाडीकडुनही राज यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले होते. या सर्व आरोप-प्रत्यारोपांना सडेतोड उत्तर देण्यासाठी राज ठाकरे यांची 9 एप्रिल रोजी ठाण्यातील मूस रोडवर उत्तर सभा घेण्याचे ठरवले होते. विधानसभा निवडणुकीनंतर प्रदीर्घ काळाने ठाण्यात ही पहिलीच जाहिर सभा होत असल्याने मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह हजारो मनसैनिक सभा यशस्वी करण्यासाठी झटत होते. मात्र, पोलिसानी ऐन नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर सभेसाठी गर्दी उसळुन वाहतुकीची प्रचंड समस्या निर्माण होईल. असे कारण देत सभेला परवानगी नाकारली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

मनसेच्या या उत्तर सभेसाठी सुरुवातीला गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोडवरील रस्ता निश्चित करून मनसे नेते नितिन सरदेसाई (Nitin Sardesai) यांनी बुधवारी पाहणीही केली होती. मात्र, पोलिसांनी या रस्त्यावर सभेसाठी परवानगी नाकारल्याने आज सकाळी बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनीही ठाण्यात भेट देऊन रस्त्यावर टेबल टाकुन राज ठाकरे यांची सभा घेण्याचा निर्धार व्यक्त केला होता. दरम्यान, आज दिवसभर मनसे नेत्यांनी काथ्याकूट केल्यानंतर पोलीसांनी नमते घेत 9 एप्रिल ऐवजी 12 एप्रिल रोजी गडकरी रंगायतन येथील डॉ. मूस रस्त्यावरील सभेला परवानगी दिली आहे.

 

 

Web Title : Raj Thackeray | That’s it! Raj Thackeray’s meeting in Thane, the attention of entire Maharashtra to what the MNS president will say

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | संजय राऊतांच्या अडचणीत वाढ? रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणात मुंबई पोलिसांकडून समन्स

Protein Shake Side Effects | प्रोटीन शेक पिण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 9 गोष्टी, अन्यथा पडू शकते महागात

Black Raisin Water Benefits For Women’s | महिलांची ही एक पॉवर वाढवते काळ्या मनुकांचे पाणी, लेडीजच्या अनेक समस्यांवर अचूक उपाय

 

Related Posts