IMPIMP

Pune Crime | PhonePe द्वारे पैसे दिल्याचे भासवून 9 सराफांना गंडा ! पुणे पोलिसांकडून एकाला अटक; 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

by nagesh
Pune Crime | Vishal Manik Ghodke Arrested Pune Hadapsar Police Cheating Fraud Case PhonePe Goldsmith

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | सोन्याचे दागिने (Gold Jewelry) खरेदी करुन पैसे फोन पे (PhonePe) द्वारे दिल्याचे भासवून 9 सराफांची (Goldsmith) फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार उघडकीस (Pune Crime) आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Pune Police) एकाला अटक (Arrest) केली असून 8 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीने हडपसर परिसरातील रोनक ज्वेलर्समध्ये (Ronak Jewelers) सोन्याची अंगठी घेऊन त्याचे पैसे फोन पे द्वारे केल्याचे भासवून फसवणूक केली होती. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar police station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

विशाल माणीक घोडके Vishal Manik Ghodke (वय-28 रा. होलेवस्ती, होले बिल्डींग, उंड्री) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत रामेश्वर नंदलाल वर्मा Rameshwar Nandlal Verma (रा. अ‍ॅमनोरा टाऊनशिप-Amanora Township, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार 24 जानेवारी 2022 रोजी घडला होता. आरोपीने फिर्यादी यांच्या दुकानातून 5 ग्रॅम 480 मिली वजनाची अंगठी (Gold Ring) घेऊन त्यांची फसवणूक केली होती.

 

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार प्रशांत दुधाळ (Prashant Dudhal), सुरज कुंभार (Suraj Kumbhar) यांना आरोपीची माहिती मिळाली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान त्याने मागील दोन महिन्यांच्या कालावधीत पुणे शहर (Pune Crime) आणि परिसरातील वेगवेगळ्या सराफ व्यावसायिकांची फसवणूक केल्याचे सांगितले.

 

गुन्हा करण्याची पद्धत
आरोपी ज्वेलर्सच्या दुकानात जाऊन दागिने पहून ते दागिने (Jewelry) खरेदीच्या वेळेस मोबाईल मधील फोन पे या पेमेंट अ‍ॅप्लिकेशन मधून सोनाराच्या दुकानातील पेमेंट अ‍ॅपचे स्कॅनर स्कॅन (Scanner) करुन पेमेंट फेल झाल्याचा स्क्रीन शॉट (Screenshot) काढत होता. त्यानंतर स्कीन शॉट क्रॉप करुन दुकानदाराला फेल स्क्रीन शॉट वरील युटीआर क्रमांक (UTR Number) देऊन पेमेंट झाल्याचे भासवून दागिने घेऊन जात होता. काही वेळेला दुकानदाराल पेमेंट न झाल्याने त्यांनी दागीने देण्यास नकार दिला असेही त्याने सांगितले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

50 पेक्षा जास्त जणांचा फसवणूकीचा प्रयत्न
आरोपीने एडीट केलेल्या स्क्रीन शॉटवरुन आतापर्यंत सुमारे 14 लाख रुपयाहून अधिक ट्रांन्जेक्श करुन 50 पेक्षा अधिक दुकानदारांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

 

9 गुन्हे उघड 8 लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपीने हडपसर, वानवडी (Wanwadi Police Station), चंदननगर (Chandan Nagar Police Station), भारती विद्यापीठ (Bharti Vidyapeeth Police Station), जेजुरी पोलीस ठाण्याच्या (Jejuri Police Station) हद्दीत गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपीकडून 9 गुन्हे उघडकीस आणून पोलिसांनी 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सोन्याच्या दागिन्यांसह एक सेलेरिओ कारचा समावेश आहे. आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addl CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 नम्रता पाटील (DCP Namrata Patil),
सहायक पोलीस आयुक्त बजरंग देसाई (ACP Bajrang Desai),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे (Senior Police Inspector Arvind Gokule),
पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिगंबर शिंदे (Police Inspector Digambar Shinde),
पोलीस निरीक्षक गुन्हे विश्वास डगळे (Police Inspector Vishwas Dagle)
याच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde),
पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे (PSI Avinash Shinde), पोलीस अमलदार, प्रदीप सोनवणे, अविनाश गोसावी,
संदीप राठोड, समीर पांडुळे शशिकांत नाळे, सचिन जाधव, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ निखील पवार,
प्रशान टोणपे, रियाज शेख, सचिन गोरखे, सुरज कुमार यांचे पथकाने केली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Vishal Manik Ghodke Arrested Pune Hadapsar Police Cheating Fraud Case PhonePe Goldsmith

 

हे देखील वाचा :

Nawab Malik | ईडी कोठडीत असलेल्या नवाब मलिकांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी जेजे रुग्णालयात दाखल

Malaika Arora Shirtless Look | मलाइका अरोरानं पार केला निर्लज्जपणाचा कळस, रोडवरच टी-शर्ट काढून लटकवला गळ्यात..!

Health Benefits Of Salad | जर तुम्हाला वाढते वजन कंट्रोल करायचे असेल तर डाएटमध्ये समावेश करा ‘या’ 2 ‘सलाड’चा; जाणून घ्या

BP Control Tips | हाय ब्लड प्रेशर कंट्रोल करायचे असेल तर जाणून घ्या 6 प्रभावी उपाय

 

Related Posts