IMPIMP

Pune Fire | महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाइन फटून आग, मोठा अनर्थ टळला

by nagesh
pune fire | maharashtra natural gas pipeline bursts catches fire incident in bibvewadi area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुण्यातील बिबवेवाडी (Bibvewadi Pune) परिसरातील स्वामी विवेकानंद मार्गावरील अपर येथील डॉल्फिन चौकात महाराष्ट्र नॅचरल गॅस (Maharashtra Natural Gas) पाईपलाईन फुटून आग (Pune Fire) लागल्याची घटना घडली आहे. डॉल्फिन चौकात (dolphin chowk) बुधवारी रात्री साडे बाराच्या सुमारास ड्रेनजची नवीन पाईप लाइन टाकण्याचे काम सुरु असताना गॅस पाईप लाइनला धक्का लागला. त्यामुळे मोठ्या प्रमाणत आग (Pune Fire) लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आगीवर नियंत्रण मिळवले.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

विवेकानंद मार्गावर रस्त्याच्या एका बाजूला महाराष्ट्र नॅचरल गॅस पाईप लाईन आहे. या ठिकाणी काम करताना एमनजीलचे अधिकारी, ठेकेदार व महापालिका (Pune Corporation) प्रशासनाचे अधिकारी यांना कोणतीही कल्पना न देता ड्रेनेज पाईप लाईनचे काम (Drainage pipeline work) सुरु होते. प्रशासन आणि ठेकेदार यांच्यात कोणताही समन्वय नसल्याने ही दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी रस्त्याचे काम सुरु असताना अनेकवेळा गॅस पाईप लाइन फुटण्याचे प्रकार घडले आहेत.

बुधवारी रात्रीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे मोठा अनर्थ टळला. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्याच्या शेजारी चैत्रबन झोपडपट्टी असून मोठी दुर्घटना (Pune Fire) टळली. रात्रीच्या वेळी घटना घडल्यामुळे गॅस पुरवठा खंडीत करण्यात आला होता, पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास गॅस पाईप लाइन दुरुस्त करुन गॅस पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

याप्रकरणी महाराष्ट्र नॅचरल गॅसचे अधिकारी कौस्तुभ मिहीर (Kaustubh Mihir) यांनी सांगितले,
की रात्रीच्या वेळी काम सुरु करण्यात येणार असल्याची कल्पना देण्यात आली नाही.
विद्युत केबलला धक्का लागल्याने गॅस लाइने पेट घेतला.
अग्निशमन दल व एमनजीलच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ आग आटोक्यात आणली.

Web Title :- pune fire | maharashtra natural gas pipeline bursts catches fire incident in bibvewadi area

हे देखील वाचा :

Will Smith | ‘ब्रेकअपनंतर मी असंख्य महिलांशी सेक्स केलं’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने केला खुलासा

Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचा दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरव

ST Workers Strike | ‘भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले, मागण्या गैरवाजवी’

Related Posts