IMPIMP

ST Workers Strike | ‘भाजपने एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले, मागण्या गैरवाजवी’

by nagesh
ST Workers Strike | ncp nawab malik criticized bjp gopichand padalkar and sadabhau khot st workers strike

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनीकरण (Merger) करावे आणि अन्य काही मागण्यांसाठी गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेले एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन (ST Workers Strike) तूर्तास मागे घेत असल्याचे भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) आणि सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी जाहीर केले. परिवहन मंत्र्यांनी पगारवाढीची (Salary increase) घोषणा करूनही एसटी कर्मचारी विलीनीकरण यावर ठाम (ST Workers Strike) आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते (NCP) नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. गैरवाजवी मागणी घेऊन भाजपवाल्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना भडकवण्याचे काम केले असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

एसटी कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळावेत, महागाई वाढत असताना कर्मचाऱ्यांचे पगार वाढले पाहिजेत, अशी भूमिका राज्य सरकारची (Maharashtra Government) होती.
मात्र, भाजपच्या लोकांनी एसटी महामंडळाला (ST Corporation) विलीन करा आणि त्यांना सरकारी कर्मचारी घोषित करा अशी गैरवाजवी मागणी घेऊन लोकांना भडकवण्याचे काम केले.
अशी टीका मलिक यांनी केली आहे.

राज्यात इतर महामंडळे आहेत

विलिनीकरणाचा निर्णय सरकारने घेतला असता, तर या राज्यातील नगरपालिका आणि इतर महामंडळे आहेत.
त्यातील सर्व कर्मचारी आम्हाला सरकारी कर्मचारी घोषित करा, 7 वा वेतन आयोग (7th Pay Commission) लागू करा ही मागणी घेऊन पुढे आले असते.
या राज्यातील उत्पन्नाच्या स्त्रोतांचा विचार करुन या मागण्या मान्य केल्यानंतर सरकार कर्ज काहूनही त्यांना पगार देऊ शकले नसते.
ही सत्य परिस्थिती आहे, असे मलिक यांनी म्हटले. (ST Workers Strike)

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

भाजप कर्मचाऱ्यांची दिशाभूल करत आहे

महामंडळ व्यवस्थित चालले पाहिजे, त्यांना वेळेत पगार मिळाला पाहिजे, बोनस मिळाला पाहिजे ही सरकारची भूमिका आहे.
मात्र भाजपचे नेते लोकांची दिशाभूल करुन त्यांना भडकवत आहेत. हळूहळू एसटी कर्मचारी कामावर रुजू झाले.
सरकारने पगारवाढ आणि वेळेवर पगार व बोनस देण्याची घोषणा केली. कर्मचारी कामावर येण्यास सुरुवात झाली.
आपली दिशाभूल करण्यात आल्याचे त्यांना समजल्याने त्यांनी माघार घेतल्याचं मलिक म्हणाले.

Web Title : ST Workers Strike | ncp nawab malik criticized bjp gopichand padalkar and sadabhau khot st workers strike

हे देखील वाचा :

Income Tax Return | भाड्याच्या घरात राहात असतानाही प्राप्तीकरात मिळते सूट; जाणून घ्या काय आहेत नियम आणि अटी

Nikki Tamboli | पुढे काय इच्छा आहे निक्की तांबोलीच्या प्रश्नाने चाहत्यांना लावलं वेड, भरभरुन केल्या कमेंट्स

IPL 2022 | CSK ने केला रैनाचा पत्ता कट तर ऋतुराजची ‘चांदी’, धोनीसोबत केला स्पेशल करार !

Related Posts