IMPIMP

Pune First | अग्रेसर पुण्यासाठी ‘पुणे फर्स्ट’ उपक्रम – सभागृह नेते गणेश बिडकर यांची माहिती

by nagesh
Ganesh Bidkar | BJP leader Ganesh Bidkar s House leadership in Pune Municipal Corporation canceled by High Court

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune First | पुणे शहराचा ऐतिहासिक वारसा, विकास तसेच प्रगती देशभरासह जागतिक पातळीवर पोहचावी, यासाठी ‘पुणे फर्स्ट’ हा प्लॅटफॉर्म सुरू करण्यात आला आहे. ही एक वेबसाईट असून याचा शुभारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते नुकताच झाला. पुणे महानगरपालिकेतील (Pune Corporation) सभागृह नेते गणेश बिडकर (PMC House Leader Ganesh Bidkar) यांच्या पुढाकारातून पुणे फर्स्ट (Pune First) उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पुणे शहर म्हणजे महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, पुणे हे आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रात फक्त राज्यातच नव्हे तर देशात अग्रेसर असणारे शहर आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने सुद्धा पुणे महानगरपालिका हे देशातील सर्वात मोठे शहर ठरलेले आहे. पुण्याबद्दलची माहिती जगभर पोहोचवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहेच, पण भविष्यातही सर्वच बाबतीत पुणे कायमच अग्रेसर राहावे, विकासाचे आणि प्रगतीचे नवे मानदंड आपल्या शहराने स्थापन करावेत यासाठी गट- तट, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून “पुणे फर्स्ट” या विचाराने जनतेने चर्चा करावी, संवाद करावा, मान्यवरांनी मार्गदर्शन करावे यासाठीचे व्यासपीठ म्हणून सुद्धा हा मंच काम करेल, असे सभागृह नेते बिडकर यांनी स्पष्ट केले. (Pune First)

 

या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्राच्या शहरी विकासाचे शिल्पकार आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली. www.punefirst.org या वेबसाईटला भेट देऊन नागरिकांना या उपक्रमाची सविस्तर माहिती जाणून घेता येणार आहे. अधिकाधिक पुणेकरांनी या वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन सभागृह नेते बिडकर यांनी केले आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune First | Pune First initiative for leading Pune Information of PMC House Leader Ganesh Bidkar

 

हे देखील वाचा :

Advocate Gunratna Sadavarte | ‘एसटी संपावर तोडगा काढण्यासाठी पवारांकडे कशाला जाता, ते काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत का?’

Pune Traffic Police | तुळापुर येथील इंद्रायणी नदीवरील मोठा पुल जड वाहतुकीसाठी बंद

Immunity Booster | सर्दी आणि फ्लू सारख्या लक्षणांमध्ये लवकर आराम देईल ‘हा’ आयुर्वेदिक काढा

 

 

Related Posts