IMPIMP

Pune Job Fair | पुण्यात 10 मे रोजी ‘रोजगार मेळावा

by nagesh
 Pune Job Fair | 'Job fair' on May 10 in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Job Fair | नोकरी इच्छुक युवक-युवतींना नामवंत खाजगी कंपन्या, कारखाने, उद्योगसमूह यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने प्रत्येक महिन्याला रोजगार मेळावा अर्थात ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे (Placement Drive) आयोजन करण्यात येत आहे. त्याअंतर्गत २०२३-२४ मधील दुसरा रोजगार मेळावा येत्या १० मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. (Pune Job Fair)

 

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हे कार्यालय वेळोवेळी जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागात रोजगार मेळावे आयोजित करुन, सर्व स्तरातील जास्तीत जास्त उमेदवारांना रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न सातत्याने करीत आहे. याचाच एक पुढील टप्पा म्हणून आता प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी या कार्यालयामध्येच प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Job Fair)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रसंगी विविध पदांकरिता वेगवेगळ्या पात्रतेच्या उमेदवारांची तात्काळ नोकरभरती आवश्यक आहे अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींना या कार्यालयात उमेदवारांच्या थेट प्रत्यक्ष मुलाखती घेण्याकरिता पाचारण करण्यात येणार आहे. या मुलाखतींना प्रत्यक्ष हजर राहून पात्र होतील अशा उमेदवारांना लगेच जागेवरच नोकरीची संधी मिळणार आहे.

 

पुणे जिल्ह्यातील नोकरीइच्छुक युवक-युवतींनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी. नोंदणी नसल्यास प्रथम आपली नावनोंदणी करावी आणि होमपेजवरील नोकरीसाधक (जॉब सीकर) लॉगीन मधून आपापल्या युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे.

 

उमेदवारांनी लॉगीन केल्यानंतर डॅशबोर्ड मधील ‘पंडीत दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर’
या बटनावर क्लिक करुन प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून त्यातील
‘2nd PLACEMENT DRIVE-PUNE’ या रोजगार मेळाव्याची निवड करावी.
उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदांची माहिती घ्यावी आणि आवश्यक पात्रता धारण करीत
असल्याची खात्री करुन उचित असलेल्या रिक्तपदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंतीक्रम नोंदवावा.

 

ऑनलाईन नोंदणी केलेल्या उमेदवारांनी बुधवार १० मे रोजी समक्ष जिल्हा कौशल्य विकास,
रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे-११ येथे आपल्या सर्व कागदपत्रांसह उपस्थित राहून
या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या महापर्वणीचा लाभ घ्यावा,
असे आवाहन प्र. सहाय्यक आयुक्त सागर मोहिते (Sagar Mohite) यांनी केले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Job Fair | ‘Job fair’ on May 10 in Pune

 

हे देखील वाचा :

Solapur Pune Highway Accident | दुचाकीवरून ट्रिपल सिट निघालेल्या 3 मित्रांचा अपघातात मृत्यू, सोलापुर-पुणे महामार्गावरील घटना

ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 7 हजार रूपयाची लाच घेताना सहाय्यक पोलिस निरीक्षक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळयात

Nandurbar News | नंदुरबार, शहादा शहरांसाठी मंजूर करण्यात आलेला निधी वेळेत खर्च करावा -पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित

 

Related Posts