IMPIMP

Pune Katraj Kondhwa Road | उद्योजक प्रकाश धारीवाल यांनी रस्त्यासाठी जागा दिल्याने कात्रज – कोंढवा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग झाला सुकर

उर्वरीत जागा मालकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद - अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांची माहिती

by sachinsitapure
Pune Katraj Kondhwa Road

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Katraj Kondhwa Road | बहुचर्चित आणि प्रलंबित कात्रज कोंढवा रोडच्या कामाबाबत सकारात्मक बाब पुढे आली आहे. भुसंपादनासाठी कसोशिने प्रयत्न करणार्‍या महापालिकेच्या प्रयत्नांना मोठे यश आले असून कोंढवा येथील टिळेकरनगर ते खडीमशीन चौक ( Tilekar Nagar To Khadi Machine Chowk) दरम्यान २४ मीटर रुंद आणि सुमारे ३०० मीटर रस्त्यासाठी उद्योजक प्रकाश धारीवाल (Prakash R. Dhariwal) यांनी टीडीआरच्या Transferable development rights (TDR) बदल्यात कुठल्याही अटींशिवाय जागा देण्याची तयारी दर्शविली. एवढेच नव्हे तर त्यांनी रस्त्याचे काम सुरू करण्याचीही परवानगी दिल्याने महापालिकेने आजच येथील जमिन लेव्हलिंगचे काम हाती घेतल्याची माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे (Vikas Dhakane) यांनी दिली. (Pune Katraj Kondhwa Road)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

विकास ढाकणे यांनी सांगितले, की राज्य शासनाने कात्रज- कोंढवा रस्त्याच्या कामासाठी २०० कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली आहे. भूसंपादनाअभावी या रस्त्याचे काम मागील काही वर्षांपासून प्रलंबित असून वाहतूक कोंडी आणि अपघात अशी या रस्त्याची ओळख झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर महापालिका भूसंपादनासाठी जागा मालकांशी सातत्याने संपर्क साधत असून अनेकांनी त्यांची जमिन देण्याची तयारी दर्शविली आहे. दरम्यान, कात्रज चौक ते कोंढवा येथील खडी मशीन चौकादरम्यान रस्त्यासाठी लागणारी सर्वात मोठी जागा ही उद्योजक प्रकाश धारीवाल यांच्या मालकिची आहे. त्यांच्या साधारण ६० गुंठे जागेचे भूसंपादन करावे लागणार आहे. यासंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली. यावर धारीवाल यांनी कुठल्याही अटी, शर्ती न ठेवता तातडीने ही जागा देण्याची तयारी दर्शविली. एवढेच नव्हे महापालिकेने या जागेचा तडजोडीने ताबा घेण्याची कागदोपत्री प्रक्रिया पुर्ण करून आजच तातडीने कामही सुरू केले आहे. (Pune Katraj Kondhwa Road)

ताब्यात आलेल्या जागेवर रस्त्यावर सुरूवातीला लेव्हलिंग करून मुरूम टाकून कान्हा हॉटेल चौक ते खडीमशीन चौक या रस्त्याला पर्यायी मार्ग वापरासाठी तयार करण्यात येईल. यावरून जड वाहतूक सुरू करून जुन्या रस्त्याच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येईल. यामुळे या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मोठी मदत होणार आहे. उर्वरीत जागा मालकांसोबतही भूसंपादनासाठी बोलणी सुरू असून त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. यामुळे कात्रज- कोंढवा रस्त्याचे काम वेळेत पुर्ण करणे शक्य होईल, असा विश्‍वासही ढाकणे यांनी व्यक्त केला.

खराडी ते हडपसर रस्त्यावरील मुंढवा चौकही झाला मोकळा

खराडी ते हडपसर रस्त्यावरील (Kharadi To Hadapsar Road) मुंढवा चौकामध्ये (Mundhwa Chowk) येणार्‍या
काही मिळकतींमुळे या ठिकाणी मोठ्याप्रमाणात वाहतुक कोंडी होत होती. महापालिका प्रशासनाने मागील काही दिवसांत येथील काही अनधिकृत मिळकती पाडून टाकल्या होत्या. मात्र, चौकातील चार ते पाच मिळकतींचा ताबा घेण्यात कायदेशीर अडचणी होत्या. मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त महेश पाटील, प्रतिभा पाटील, विधी अधिकारी नीशा चव्हाण, अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, कार्यकारी अभियंता रोहीदास गव्हाणे आदींनी यासाठी जागा मालकांकडे सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर जागा मालकांनीही स्वखुशीने ताबा दिला. महापालिका प्रशासनाने या मिळकती रिक्त करून घेतल्यानंतर त्या पाडून टाकल्या आहेत. तातडीने येथे रस्ता रुंदीकरण करण्यात येणार असून चौकातील कोंडी सुटण्यास मदत होईल,
असा विश्‍वास अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी व्यक्त केला.

MLA Ravindra Dhangekar On Pune Drug Case | ‘…अन्यथा पोलीस बनावट चकमकीत ललित पाटीलला मारतील’, आमदार रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप (Video)

Related Posts