IMPIMP

Pune Khadakwasla Dam | खडकवासला धरणात सांडपाणी; विधिमंडळात मुख्यमंत्र्यांची कबुली

by nagesh
Irrigation Department | Ban on concrete structures within 200 meters of reservoirs of dams in the state - Irrigation Department

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Khadakwasla Dam | शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणात घरगुती सांडपाणी आणि रसायनयुक्त पाणी सोडले जात असल्याचे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सोमवारी विधिमंडळात कबुल केले. याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून Maharashtra Pollution Control Board (MPCB) जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद (IAS Ayush Prasad) यांना योग्य कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी विधिमंडळात स्पष्ट केले. (Pune Khadakwasla Dam)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

विधिमंडळ पावसाळी अधिवेशनात खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांनी हा प्रश्न विचारला होता. खडकवासला धरणाच्या जलाशयात विनाप्रक्रिया घरगुती सांडपाणी तसेच रसायनयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याचे एप्रिल महिन्यात निदर्शनास आले आहे. या दूषित पाण्याच्या वापरामुळे परिसरातील नागरिक, प्राणी, वनस्पती आणि पक्ष्यांवर विपरित परिणाम झाला किंवा कसे?, त्यावर शासनाकडून काय कार्यवाही करण्यात आली? असा प्रश्न तापकीर यांनी उपस्थित केला होता. (Pune Khadakwasla Dam)

 

त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘की जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी ८ ऑगस्ट २०२२, तर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी यांनी १३ ऑगस्ट २०२२ रोजीच्या अहवालानुसार असे काही झाल्याचे निदर्शनास आलेले नाही, असे कळविण्यात आले आहे. मात्र, खडकवासला जलाशय परिसरात हवेली तालुक्यातील मौजे गोऱ्हे बुद्रुक, मालखेड, खानापूर, डोणजे, कुडजे, मांडवी खुर्द, मांडवी बुद्रुक, सांगरून या गावांमधून निर्माण होणारे सांडपाणी तसेच काही प्रमाणात घरगुती घनकचरा विनाप्रक्रिया खडकवासला धरणात जातो. या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.’

 

दरम्यान, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून उचलण्यात येणाऱ्या पाण्यातील कॉलिफॉर्म आणि ई कोलाय या बॅक्टेरियाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे.
सुमारे १५ वर्षांपूर्वी या जीवाणूंचे प्रति १०० मिलि. मधील प्रमाण ८००-९०० इतके होते.
ते आता दीड लाखापर्यंत वाढले आहे. साठलेले पाणी, मैलामिश्रित पाण्यात बॅक्टेरिया जलदगतीने वाढतात.
धरणांच्या परिसरात गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर फार्महाउस, हॉटेलांचे प्रमाण वाढले आहे.
त्यांमध्ये ड्रेनेजची व्यवस्था नसल्याने या ठिकाणी वापरण्यात येणारे पाणी ओढे-नाल्यांच्या प्रवाहात सोडण्यात येते.
तेथून ते धरणामध्ये येत असल्यानेही धोका वाढत असल्याचे निरीक्षण पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune Khadakwasla Dam | Sewage in Khadakwasla Dam; Chief Minister’s confession in the Legislature

 

हे देखील वाचा :

Sonali Phogat Passes Away | टिकटॉक स्टार आणि भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे निधन, गोव्यात हार्ट अटॅकने गमावला जीव

PM Kisan-Pune | पीएम किसान योजनेच्या चुकीच्या लाभार्थ्यांकडून पैसे वसूल करण्यात जिल्हा प्रशासन ‘फेल’

Ajit Pawar | अजित पवार सत्ताधारी आमदारावर भडकले; म्हणाले – ‘अरे थांब ना बाबा.. आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?’

 

Related Posts