IMPIMP

Ajit Pawar | अजित पवार सत्ताधारी आमदारावर भडकले; म्हणाले – ‘अरे थांब ना बाबा.. आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का?’

by nagesh
Devendra Fadnavis | devendra fadanvis criticized ajit pawar over sambhaji maharaj dharmveer remark

मुंबई :  सरकारसत्ता ऑनलाइन महाराष्ट्रचं पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरु असून सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे सभागृहात आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. विशेष म्हणजे निधी वाटपाच्या मुद्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना उद्देशून बोलत असताना खाली बसून बोलणाऱ्या आमदारांवर अजित पवार (Ajit Pawar) चांगलेत भडकल्याचे पहायला मिळाले. यावेळी त्यांनी ‘अरे थांब ना बाब, तुलाच फारय कळतंय का? आम्ही इथं गोट्या खेळायला आलो आहे का?’ असा संतप्त सवाल त्यांनी केला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

अजित पवार (Ajit Pawar) हे महाविकास आघाडी सरकारच्या (Maha Vikas Aghadi Government) काळातील 25/15 च्या निधी वाटपासंदर्भात सांगत होते. महाविकास आघाडीमध्ये 25/15 मध्ये मविअच्या आमदारांना (MLA) 5 कोटीच्या निधीचे वाटप करण्यात आले होते, ते मी कबुल करतो, असे अजित पवार म्हणाले. तर त्याचवेळी विरोधी पक्षातील आमदारांच्या याद्या घेऊन त्यांनाही 2 कोटी रुपये दिल्याची आठवण त्यांनी करुन दिली.

 

मात्र त्यांचे हे विधान ऐकूण सत्ताधाऱ्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.
गोंधळ वाढत असतानाच अजित पवार म्हणाले, एक मिनीट, मघाशीच सांगितलं आहे की तुम्हाला जे बोलायचं आहे
ते नंतर उठून बोला. यानंतरही सत्ताधारी पक्षातून एक जण त्यांच्या भाषणात अडथळा आणत होता.
यावर संतापून अजित पवार म्हणाले, अरे थांब ना बाबा, तुलाच फार कळतयं का? आम्ही काय गोट्या खेळायला आलोय का? असे ते म्हणाले.

 

Web Title :- Ajit Pawar | ncp leader ajit pawar get angry in assembly session while speaking on fund mentioning bjp leader devendra fadnavis

 

हे देखील वाचा :

Chandrakant Patil | ‘त्या’ विद्यार्थ्यांची पदवी आणि पदव्युत्तरपर्यतची फी राज्य सरकार भरणार – चंद्रकांत पाटील

Dhananjay Munde | CM शिंदेंनी स्वत:चाच निर्णय फिरवल्यावरून धनंजय मुंडेंचा टोला

Ajit Pawar | ‘घाव मेरा गहरा है, अगला नंबर तेरा है’ ! बारामतीमधील खूनच्या घटनेचा ‘विषय’ अधिवेशनात; अजित पवार म्हणाले…

 

Related Posts