IMPIMP

Pune Kothrud News | पुणे : कोथरुड – सोलार, सीसीटीव्ही आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी मदत करणार; चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

by nagesh
Pune Kothrud News | will help with solar, CCTV and solid waste management initiatives; Assurance of Chandrakant Patil

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Kothrud News | कोथरुड मधील सोसायट्यांना सोलार, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून (Amdar Nidhi) मदत करण्याची ग्वाही आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज दिली. तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. (Pune Kothrud News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

कोथरुड मतदारसंघातील एरंडवणे (Erandwane) भागातील विविध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज संवाद साधून, समस्या जाणून घेतल्या. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार (IAS Kunal Khemnar), प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर (Sandeep Khardekar), कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी (Punit Joshi), माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर (Manjushree Khardekar)यांच्या सह नगरसेवक दीपक पोटे (Deepak Pote), जयंत भावे (Jayant Bhave) व इतर मान्यवर उपस्थित होते. (Pune Kothrud News)

 

या बैठकीत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रामुख्याने महापालिकेच्या अखत्यारीतील वेगवेगळ्या अडचणी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सांगितल्या. यात प्रामुख्याने पाणीपुरवठा, वाहतूक नियंत्रण, कचरा संकलन, रस्ते दुरुस्ती आदींचा समावेश होता. या सर्व समस्या जाणून घेतल्यानंतर, तातडीने दूर करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

 

यासोबतच सोसायटींनी ऊर्जा निर्मितीत स्वयंपूर्ण सोलार पॅनल बसविणे, सीसीटीव्ही कॅमेरे आणि घनकचरा व्यवस्थापन होण्यासाठी प्रक्रिया उपक्रमांसाठी आमदार निधीतून मदत करु, असे आश्वास्त केले. त्यासोबतच प्रत्येक सोसायटीतील घरकाम करणाऱ्या महिलांसाठी सॅनिटरी पॅड नॅपकीन आणि सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन बसवून देण्याची ग्वाही दिली. तसेच, उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व सोसायट्यांनी पाण्याचे नियोजन करण्याचे आवाहन केले.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Kothrud News | will help with solar, CCTV and solid waste management initiatives; Assurance of Chandrakant Patil

 

हे देखील वाचा :

Bharatiya Vidya Bhavan-Infosys Foundation | भारतीय विद्या भवनमध्ये 27 एप्रिल रोजी ‘लक्ष्य’ नृत्य कार्यक्रम

Pune Pimpri Chinchwad Crime News | पुणे पिंपरी-चिंचवड क्राईम न्यूज : चाकण पोलिस स्टेशन – अनैतिक संबंधातून सव्वा वर्षाच्या मुलाला गरम पाण्यात बुडवून मारले

Maharashtra Tourism – MTDC | पर्यटन महामंडळात फेलोशिपची तरुणांना संधी; 15 मेपर्यंत अर्ज पाठविण्याचे आवाहन

 

Related Posts