IMPIMP

Pune Lok Sabha Bypoll Election | पुणे लोकसभा मतदारसंघावर अजित पवारांचा दवा, काँग्रेसचं टेन्शन वाढलं; अजित पवार म्हणाले…

by nagesh
Pune Lok Sabha Bypoll Election | ncp leader ajit pawar once again claims the pune lok sabha seat

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Lok Sabha Bypoll Election | भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Late BJP MP Girish Bapat) यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दावा केला आहे. महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) ही जागा काँग्रेसकडे (Congress) आहे. असे असताना राष्ट्रवादीने (NCP) या जागेवर दावा केला आहे. तर दुसरीकडे ही जागा कोणत्याही परिस्थितीत सोडणार नसल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे पोटनिवडणूकीपूर्वी (Pune Lok Sabha Bypoll Election) महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे.

काय म्हणाले अजित पवार?

अजित पवार यांनी पुणे लोकसभा पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया देताना पोटनिवडणुकीत उमेदवार ठरवताना महाविकास आघाडी अंतर्गत चर्चा करु असं म्हटले. ते पुढे म्हणाले, जिथे ज्या पक्षाची ताकद जास्त आहे तिथे त्यांना प्राधान्य दिले जाईल. पुणे शहर व जिल्ह्यात नेहमीच आमची ताकद राहिली आहे. त्यामुळे ती जागा कोणाला सोडणे हा वादा होऊ शकत नाही. निवडणुकीची रणनिती ठरवताना जिल्हा पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांनी देखील पोटनिवडणुकीवर प्रतिक्रिया दिली आहे.
पुणे लोकसभा पोटनिवडणूक होईल असं वाटत आहे. ज्या उमेदवाराची निवडून येण्याची क्षमता आहे,
अशा उमेदवाराला मविआ कडून तिकीट दिले जाईल. महाविकास आघाडीतील घटक पक्ष यावर चर्चा करुन निर्णय घेतील.
तोपर्यंत ज्यांना दावा करायचा आहे, त्यांना करु द्या त्याने काही फरक पडत नसल्याचे शरद पवार यांनी म्हटले.

Web Title : Pune Lok Sabha Bypoll Election | ncp leader ajit pawar once again claims the pune lok sabha seat

Related Posts