IMPIMP

Pune Lok Sabha Bypoll Election | गिरीश बापटांचा वारसदार कोण? BJP कडून 5 नावं चर्चेत तर काँग्रेसचे ‘हे’ 2 नेते इच्छुक

by nagesh
Pune Lok Sabha Bypoll Election | pune loksabha bypoll who will be the bjp girish bapat successor swarda bapat murlidhar mohol sanjay kakade jagdish mulik in the race congress mohan joshi and arvind shinde

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Lok Sabha Bypoll Election | भाजपचे दिवंगत खासदार गिरीश बापट (Late BJP MP Girish Bapat)
यांचे नुकतेच निधन झाले आहे. बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे
लोकसभा पोटनिवडणुकीत (Pune Lok Sabha Bypoll Election) भाजपकडून (BJP) कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या पाच नेत्यांच्या नावांची सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे गिरीश बापट यांचा वारसदार कोण? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

भाजपकडून ‘ही’ नावे चर्चेत

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी (Pune Lok Sabha Bypoll Election) सर्वाधिक लॉबिंग हे भाजपमधेच दिसून येत आहे. भाजपकडून सध्या गिरीश बापट यांच्या स्नुषा स्वरदा बापट (Swarda Bapat), माजी महापौर (Former Mayor) मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol), प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे (Sanjay Kakade), विद्यमान शहराध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik), आमदार सिद्धर्थ शिरोळे (MLA Siddharth Shirole) यांच्या नावाची चर्चा आहे. तर मुळीक यांच्या अती उत्साही कार्यकर्त्याने त्यांचे भावी खासदार म्हणून बॅनर देखील लावले होते. जर पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली तर काँग्रेसकडून अरविंद शिंदे (Arvind Shinde) आणि मोहन जोशी (Mohan Joshi) या दोघांची नावे सध्या चर्चेत आहेत. त्यामुळे भाजपकडून कुणाला आणि काँग्रेसकडून कुणाला उमेदवारी मिळते याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

 

 

कसब्याच्या निकालावरुन भाजपचा सावध पवित्रा

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक (Late MLA Mukta Tilak) यांच्या निधनामुळे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुक (Pune Kasba Peth Bypoll Election) झाली. या पोटनिवडणुकीत भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. टिळक कुटुंबाला उमेदवारी न देता बाहेरील उमेदवार दिल्याने भाजपचा पराभव झाल्याची चर्चा होती. त्यामुळे भाजप यावेळी सावध खेळी खेळणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. टिळक कुटुंबियांना भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे पुण्यातील राजकारण पेटलं होतं. भाजपच्या निर्णयावरुन अनेकांनी टीका देखील केली होती. तर भाजप प्रदेश उपाध्यक्ष संजय काकडे यांनी उमेदवारी देताना आमची चूक झाल्याचे कबुल केलं होतं. त्यामुळे या पोटनिवडणुकीत भाजपकडून बापट यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे.

 

 

पोटनिवडणूक बिनविरोध होणार?

गिरीश बापट यांचे चिरंजीव गौरव बापट (Gaurav Bapat) यांना राजकारणात फारसा रस नाही.
मात्र, त्यांच्या स्नुषा स्वरदा बापट यांना राजकारणाचा अनुभव आहे.
लग्नाच्या आधी त्या सांगली महानगरपालिकेत (Sangli Municipal Corporation) नगरसेविका होत्या.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे देखील त्यांना अनेक वर्ष काम केले आहे.
बापट यांच्या खासदारकीच्या निवडणुकीपासून त्या पुण्याच्या राजकारणात (Pune Politics) सक्रिय आहेत.
ज्यावेळी बापट यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यावेळी मतदारसंघाची जबाबदारी त्यांच्यावर होती.
त्यांनी ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली.
त्यामुळे भाजपकडून स्वरदा बापट यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता जास्त आहे.
जर स्वरदा बापट यांना उमेदवारी दिली तर ही पोटनिवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिक आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-   Pune Lok Sabha Bypoll Election | pune loksabha bypoll who will be the bjp girish bapat successor swarda bapat murlidhar mohol sanjay kakade jagdish mulik in the race congress mohan joshi and arvind shinde

 

हे देखील वाचा :

Joshi Sports Cup Premier League T20 Cricket | पहिली ‘जोशी स्पोर्ट्स करंडक’ प्रिमिअर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धा ! एलके इलेव्हन, ग्लोबल वॉरीयर्स क्रिकेट क्लब संघांचे सलग विजय

S. Balan Cup T20 League | चौथी ‘एस. बालन करंडक’ अजिंक्यपद टी-२० क्रिकेट स्पर्धा ! पुणे पोलिसचा सलग दुसरा विजय; इव्हॅनो इलेव्हन संघाची विजयी कामगिरी

Maharashtra Politics News | ‘सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करताना काका आणि आकांना विचारलं का?’, भाजपचा अजित पवारांना सवाल

 

Related Posts