IMPIMP

Pune Mahavitaran News | पुणे परिमंडलात १०२ कोटींची थकबाकी ! मार्चमध्ये २२ हजारांवर वीजजोडण्या खंडित, थकीत वीजबिल भरा सहकार्य करा; महावितरणचे आवाहन

by nagesh
Pune Mahavitaran News | Dues of 102 crores in Pune circle! In March, 22,000 electricity connections were disconnected, help pay the overdue electricity bills; A call for distribution

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Mahavitaran News | पुणे परिमंडलातील ५ लाख ११ हजार ६१४ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे अद्यापही १०२ कोटी २६ लाख रुपयांची थकबाकी त्वरित भरण्याचे आवाहन महावितरणकडून (Pune Mahavitaran News) करण्यात आले आहे. तर वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने मार्च महिन्यात आतापर्यंत २२ हजार ८१६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

दरम्यान, वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र गुरुवारी (दि. ३०) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे.

 

महावितरणची संपूर्ण आर्थिक मदार ग्राहकांकडील वीजबिलांच्या दरमहा वसूलीवरच आहे. वीजबिलांच्या वसूलीमधूनच वीजखरेदीसह विविध देणी दरमहा द्यावी लागतात. त्यामुळे थकीत वीजबिलांच्या वसूलीला मोठा वेग देण्यात आला आहे. थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित करणे व खंडित केलेल्या वीजजोडण्यांची तपासणी करण्यासाठी सर्व अभियंता, अधिकारी, कर्मचारी सध्या ‘ऑन फिल्ड’ आहेत. मुख्य अभियंता राजेंद्र पवार (Chief Engineer Rajendra Pawar) परिमंडलात दौरे करून थकबाकी वसूलीचा आढावा घेत आहेत. (Pune Mahavitaran News)

 

पुणे शहरात एकूण २ लाख १५ हजार ४५४ वीजग्राहकांकडे ३३ कोटी ३४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख ८८ हजार २९५ ग्राहकांकडे २४ कोटी ८७ लाख रुपये, वाणिज्यिक २५ हजार ४६८ ग्राहकांकडे ७ कोटी ५२ लाख रुपये, औद्योगिक १ हजार ६९१ ग्राहकांकडे ९४ लाख ६४ हजार रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २७ दिवसांमध्ये पुणे शहरातील १६ हजार ८० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

 

पिंपरी चिंचवड शहरात एकूण १ लाख ४ हजार ७७० वीजग्राहकांकडे २४ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे.
यामध्ये घरगुती ८९ हजार २७६ ग्राहकांकडे १३ कोटी ९८ लाख रुपये,
वाणिज्यिक १२ हजार ३८४ ग्राहकांकडे ५ कोटी ६७ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार ११० ग्राहकांकडे ४ कोटी ८६ लाख
रुपयांची थकबाकी आहे. गेल्या २७ दिवसांमध्ये पिंपरी चिंचवडमधील ३ हजार ६१६ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण १ लाख ९१ हजार
३९० वीजग्राहकांकडे ४४ कोटी ३९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख ७२ हजार ९५२ ग्राहकांकडे
३१ कोटी ४८ लाख रुपये, वाणिज्यिक १५ हजार ८९४ ग्राहकांकडे ८ कोटी १४ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ५४४
ग्राहकांकडे ४ कोटी ७६ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर या महिन्यांत आतापर्यंत ३ हजार १२० ग्राहकांचा वीजपुरवठा
खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकबाकीचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची
कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

 

Web Title :- Pune Mahavitaran News | Dues of 102 crores in Pune circle! In March, 22,000 electricity connections were disconnected, help pay the overdue electricity bills; A call for distribution

 

हे देखील वाचा :

Six Red Snooker Tournament | सिक्स रेड स्नुकर स्पर्धेत पिनाक बॅनर्जी, आशिष थोरात यांना विजेतेपद !!

H3N2 Virus | पुण्यात ‘एच3एच2’ मुळे प्रथमच दोघांचा मृत्यू, मृतांमध्ये जेष्ठ नागरिकासह महिलेचा समावेश

Pune Kasba Peth Bypoll Election | पोटनिवडणुकीत टिळक कुटुंबाला उमेदवारी का दिली नाही?, चंद्रकांत पाटलांनी केला खुलासा, म्हणाले…

 

Related Posts