IMPIMP

Pune Mahavitaran News | थकीत वीजबिल भरा सहकार्य करा; पुणे परिमंडलात 6.60 लाखांवर वीजग्राहकांकडे 133 कोटींची थकबाकी

by nagesh
Pune Mahavitaran News | 16,000 customers who have not paid their electricity bills for three months have been cut off; Another 71 thousand arrears will be affected

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन- Pune Mahavitaran News | पुणे परिमंडलातील ६ लाख ६० हजार ५२७ घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वीजग्राहकांकडे १३३ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे. वारंवार आवाहन करूनही थकीत वीजबिलांचा भरणा केला नसल्याने वीजपुरवठा खंडित करण्याची कार्यवाही सुरु आहे. यात २२०० थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. (Pune Mahavitaran News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

वीजग्राहकांना चालू व थकीत वीजबिलांचा भरणा करणे सोयीचे व्हावे यासाठी पुणे परिमंडलातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबिल भरणा केंद्र शनिवारी (दि. २९) व रविवारी (दि. ३०) सार्वजनिक सुटीच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहे. सोबतच लघुदाब वीजग्राहकांना बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल अॅपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. (Pune Mahavitaran News)

 

सद्यस्थितीत पुणे शहरात एकूण २ लाख ८८ हजार २३६ वीजग्राहकांकडे ४६ कोटी ९९ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख ९ हजार ७७१ ग्राहकांकडे ३५ कोटी ३७ लाख रुपये, वाणिज्यिक २१ हजार १०५ ग्राहकांकडे १० कोटी २१ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ९४९ ग्राहकांकडे ५ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर १ हजार ५१८ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

 

पिंपरी चिंचवड शहरात एकूण १ लाख ३८ हजार ४६६ वीजग्राहकांकडे ३५ कोटी २७ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती १ लाख १६ हजार ९२६ ग्राहकांकडे १९ कोटी १२ लाख रुपये, वाणिज्यिक १७ हजार ६६५ ग्राहकांकडे ७ कोटी ७८ लाख रुपये, औद्योगिक ३ हजार ८७५ ग्राहकांकडे ८ कोटी ३७ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर ४५७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला.

 

तसेच ग्रामीण भागातील आंबेगाव, जुन्नर, मावळ, खेड, मुळशी, वेल्हे, हवेली तालुक्यांमध्ये एकूण २ लाख ३३ हजार ८२५ वीजग्राहकांकडे ५१ कोटी ११ लाख रुपयांची थकबाकी आहे. यामध्ये घरगुती २ लाख ९ हजार ७७१ ग्राहकांकडे ३५ कोटी ३७ लाख रुपये, वाणिज्यिक २१ हजार १०५ ग्राहकांकडे १० कोटी २१ लाख रुपये, औद्योगिक २ हजार ९४९ ग्राहकांकडे ५ कोटी ५३ लाख रुपयांची थकबाकी आहे. तर २२५ थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. वीजग्राहकांनी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा व वीजपुरवठा खंडित करण्याची कटू कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :-  Pune Mahavitaran News | Help pay overdue electricity bills; 133 crore due to 6.60 lakh electricity consumers in Pune circle

 

हे देखील वाचा :

Trinity College Pune | ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अ‍ॅन्ड रिसर्च महाविद्यालयामध्ये ड्रोन लॅबचे उद्घाटन ! डॉ. मनोहर चासकर म्हणाले – ‘अध्यापनाला संशोधनाची जोड द्यावी’

Chandrakant Patil | ‘अजित पवार आज पुन्हा गायब झाले वाटतं’, चंद्रकांत पाटलांचा टोला

NCP Chief Sharad Pawar | अजित पवारांच्या ‘भावी मुख्यमंत्री’ पदाबाबतच्या चर्चांवर शरद पवार म्हणाले…

 

Related Posts