IMPIMP

Pune Metro News | पुणे : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो मार्गिकेचा महत्वाचा टप्पा पूर्ण, 2000 सेगमेंटची उभारणी

by nagesh
Pune Metro News | Construction Of 2,000 Segment Of Hinjawadi-Shivajinagar Metro Completed Pune News

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  Pune Metro News | हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान केंद्राला म्हणजेच आयटी हबला (Hinjewadi, IT Hub of Pune) शिवाजीनगरच्या मध्यवर्ती केंद्राशी जोडणार्‍या पुणे मेट्रो मार्गिका-3 प्रोजेक्टच्या कामाने चांगलीच गती प्राप्त केली आहे. सोमवारी सकाळी मेट्रोच्या कामाचा एक महत्वपुर्ण टप्पा गाठण्यात आला. आता हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो रूटसाठीच्या (Hinjewadi To Shivajinagar Metro Route) 2000 सेगमेंटची उभारणी पूर्ण करण्यात आली आहे. (Pune Metro News)

 

दि. 23 जुलै 2022 रोजी पुणे मेट्रो मार्गिका-3 वर पहिला सेगमेंट हिंजवडी येथे उभारण्यात आल्यानंतर 9 महिन्यांच्या काळात 2000 सेगमेंट विकसकांनी उभे केले आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर रूटवरील पुणे मेट्रो मार्गिका-3 चे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (Pune Metropolitan Region Development Authority) म्हणजेच पीएमआरडीएतर्फे (PMRDA) सार्वजनिक खासगी भागीदार (पीपीपी) Public-Private Partnerships (PPPs) तत्वावर टाटा ग्रुपने हाती घेतले आहे. त्यासाठी पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि. (Pune IT City Metro Rail) या स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) Special Purpose Vehicle (SPV) ची सुरूवात करण्यात आलेली आहे. (Pune Metro News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

हिंजवडी ते शिवाजीनगर मार्गावरील मेट्रोच्या उभारणीमुळे अतिशय सुलभ, वेगवान व अल्प दरात सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध होणार आहेत. सदरील प्रोजेक्टचे काम ठरविलेल्या वेळेत पुर्ण करण्यासाठी सध्या संपुर्ण क्षमतेने काम सुरू असून अवघ्या 9 महिन्यांत 2000 सेगमेंटची आणि काम सुरू झाल्यापासुन वर्षभरातच एकूण खांब उभारणीपैकी 50 टक्के खांब उभारणी पुर्ण करण्याचा टप्पा गाठण्यात आम्हाला यश मिळाले असे पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लि., चे मुख्य कार्यकारी अधिकारी आलोक कपुर (Alok Kapoor) यांनी सांगितले.

 

 

Web Title :-  Pune Metro News | Construction Of 2,000 Segment Of Hinjawadi-Shivajinagar Metro Completed Pune News

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political News | मुख्यमंत्री नाराज आहेत का?, देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाच शब्दांत उत्तर, म्हणाले-‘तुम्ही संजय राऊतांना..’

MLA Ravindra Dhangekar | ‘शिंदे-फडणवीसांचा माझ्यावर राग, कारण…’, रविंद्र धंगेकरांचा टोला

Chowk Marathi Movie | ‘चौक’ चित्रपटाचं कौतुकास्पद पाऊल, प्रदर्शनाची तारीख घेतली पुढे! 19 मे रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल ‘चौक’

 

Related Posts