IMPIMP

Maharashtra Political News | मुख्यमंत्री नाराज आहेत का?, देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाच शब्दांत उत्तर, म्हणाले-‘तुम्ही संजय राऊतांना..’

by nagesh
Maharashtra Political News | bjp leader devendra fadnavis reaction on cm eknath shinde upset uday samant

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Maharashtra Political News | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) काही आमदारांसह भाजपसोबत (BJP) जाणार असल्याची चर्चा होती. त्यातच आता एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पदावरुन हटवण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरु असल्याचा दावा संजय राऊतांनी (Sanjay Raut) केला होता. या सर्व घडामोडी घडत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असल्याने (Maharashtra Political News) ते गावी गेल्याची चर्चा सुरु झाली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक त्यांच्या गावाकडे निघून गेल्याने ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना विचारण्यात आले. यावर त्यांनी फक्त पाच शब्दांत उत्तर दिलं. मुख्यमंत्री नराज आहेत, अशी चर्चा असल्याचे फडणवीस (Maharashtra Political News) यांना विचारले असता ते म्हणाले ‘तुम्ही संजय राऊतांना भेटलात वाटतं’ असं फडणवीस म्हणाले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Elections) पार्श्वभूमीवर ते कर्नाटकात गेले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

 

दरम्यान, शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मुख्यमंत्री नाराज असल्याच्या चर्चेवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, मुख्यमंत्री नाराज असल्याने गावी निघून गेले, या चर्चांवर बोलताना उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गावची जत्रा आहे. ते गावच्या जत्रेला गेले आहेत. गावच्या जत्रेला गेल्यावरही मुख्यमंत्री नाराज आहेत, असं कुणी म्हणत असेल तर त्यांचा नागरी सत्कार त्यांच्याच जत्रेत केला पाहिजे, असे सामंत म्हणाले.

 

 

Web Title :- Maharashtra Political News | bjp leader devendra fadnavis reaction on cm eknath shinde upset uday samant

 

हे देखील वाचा :

MLA Ravindra Dhangekar | ‘शिंदे-फडणवीसांचा माझ्यावर राग, कारण…’, रविंद्र धंगेकरांचा टोला

Chowk Marathi Movie | ‘चौक’ चित्रपटाचं कौतुकास्पद पाऊल, प्रदर्शनाची तारीख घेतली पुढे! 19 मे रोजी महाराष्ट्रभरात प्रदर्शित होईल ‘चौक’

Pune Crime News | अपहरण, बलात्कार गुन्ह्यातील महिला आरोपीची जिल्हा व सत्र न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

Aaryans Group Of Companies | आर्यन्स ग्रुपच्या वतीने मराठी कलाकारांसाठी सन्मान सोहळ्याची घोषणा; मंत्री दीपक केसरकर यांची विशेष उपस्थिती

 

Related Posts