IMPIMP

Pune Metro News | पुण्यात १२ ठिकाणी महामेट्रो उभारणार वाहनतळ, मार्चमध्ये स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट मार्गावर धावणार मेट्रो

by sachinsitapure
Mahametro Parking Spaces

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – पुण्यातील मेट्रो (Pune Metro News) प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोन (Mahametro) आणखी एक पाऊल उचलले आहे. आता शहरातील १२ ठिकाणी महामेट्रो (Pune Metro News) वाहनतळ (Parking) उभारणार आहे. तसेच प्रवाशांना मेट्रो स्थानकात जाण्या-येण्यासाठी ई-रिक्षा, शेअर रिक्षांसारखे पर्याय उपलब्ध करून देण्यात येतील. याकरता गर्दीच्या स्थानकांचा अभ्यास करणारी सल्लागार कंपनी नियुक्त केली आहे.

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

या संदर्भात माहिती देताना महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले की, वाहनतळावर प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रिक्षांसाठीही जागा असेल. तसेच बससारखी मोठी वाहनेही तिथे येऊन प्रवाशांची ने-आण करतील.

हर्डीकर यांनी सांगितले की, या जागा लहान असल्याने तिथे फार मोठ्या प्रमाणावर खासगी वाहनांसाठी वाहनतळ सुरू करता येणे शक्य नाही. त्यामुळेच रिक्षा, बस इत्यादी वाहनांसाठीचा हा तळ असेल. यावेळी संचालक हेमंत सोनवणे, सनेर पाटील हेही उपस्थित होते.

श्रावण हर्डीकर म्हणाले, मेट्रोची कोणाबरोबरही स्पर्धा नाही. शहरांतर्गत प्रवासी वाहतूक सुलभ करणे, सुरक्षित करणे, किफायतशीर करणे हा मेट्रोचा उद्देश आहे. पीएमएपीएल, रिक्षा अशा अन्य सार्वजनिक प्रवासी वाहतूकीच्या पर्यांयांबरोबर हातमिळवणी केली तरच हे शक्य आहे.

हर्डीकर म्हणाले, स्वारगेट ते सिव्हिल कोर्ट हा मेट्रोचा (Pune Metro News) मार्ग मार्च २०२४ मध्ये व सध्या
रुबी हॉलपर्यंतच असलेली मेट्रो रामवाडीपर्यंत डिसेंबरमध्ये सुरू होईल. स्वारगेट ते कात्रज हा भुयारी मार्ग
केंद्राकडे मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. तो सध्या सुरू असलेल्या मार्गाचाच विस्तारित भाग समजण्यात आला आहे.

श्रावण हर्डीकर यांनी म्हटले की, रामवाडीपासून वाघोलीपर्यंत, पिंपरीपासून निगडीपर्यंत,
वनाजपासून चांदणी चौक हे विस्तारित मार्ग मंजुरीच्या वेगवेगळ्या टप्प्यांत आहेत. तसेच स्वारगेट ते खडकवासला,
नळस्टॉप ते माणिकबाग, हडपसर ते स्वारगेट अशा मार्गांचा प्रकल्प अहवाल तयार होत आहे.
मेटड्ढोचे जाळे वाढल्याशिवाय मेट्रोचा खरा उपयोग दिसणार नाही.

या आहेत वाहनतळाच्या १२ जागा

पीसीएमसी, संत तुकारामनगर, फुगेवाडी, शिवाजीनगर, सिव्हिल कोर्ट, स्वारगेट, आयडियल कॉलनी, गरवारे महाविद्यालय,
मंगळवार पेठ, वनाज डेपो, रेंजहिल कॉर्नर, नळस्टॉप या १२ ठिकाणी वाहनतळ उभारण्यात येणार आहे.

Related Posts