IMPIMP

Pune MNS | पुण्यातील मनसे महिला कार्यकारिणीत बदल, पुणे शहर अध्यक्षपदी माजी नगरसेविका वनिता वागस्कर

by nagesh
Pune MNS | changes in pune mns women executive former corporator vanita wagaskar as pune city president

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या (Pune Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर पुण्यातील सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुण्यातील (Pune MNS) महिला संघटनेमध्ये मोठे बदल केले आहे. विद्यमान महिला अध्यक्ष अ‍ॅड. रुपाली पाटील (Adv. Rupali Patil) याची राज्याच्या महिला उपाध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तर माजी नगरसेविका वनिता वागस्कर (Vanita Wagaskar) यांच्यावर पुणे शहर (Pune MNS) अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुणे शहर महिला सेनेच्या नवीन कार्यकारणी घोषणा केली यामध्ये प्रामुख्याने वनिता वागस्कर
याची पुणे शहर अध्यक्षपदी व उपशहर अध्यक्षपदी अस्मिता शिंदे (Asmita Shinde), जयश्री पाथरकर (Jayshree Patharkar), पद्मिनी साठे (Padmini Sathe)
यांची निवड करण्यात आली आहे.

या सर्वांना निवडीची पत्र राज ठाकरे यांनी दिले. यावेळी मनसे नेते अनिल शिदोरे (Anil Shidore), राजेंद्र वागस्कर (Rajendra Wagaskar),
शहर अध्यक्ष वसंत मोरे (City President Vasant More), राज्य सरचिटणीस, राज्य उपाध्यक्ष, आजी माजी नगरसेवक, नगरसेविका,
उपशहर अध्यक्ष,विभाग अध्यक्ष, मनसे पुणे शहरातील (Pune MNS) अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी महिला संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने
केलेल्या या नेमणुका महत्वाच्या मानण्यात येत आहे.

 

Web Title : Pune MNS | changes in pune mns women executive former corporator vanita wagaskar as pune city president

 

हे देखील वाचा :

Pune Crime | ‘मार्केटिंग’वाल्या 25 वर्षीय विवाहितेला पुणे स्टेशनजवळच्या लॉजवर नेलं, कोल्ड्रींकमधून गुंगीचं औषध देऊन ‘काम’ तमाम, व्हिडीओ अन् फोटो व्हायरलची धमकी

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा राणेंवर पलटवार, म्हणाले – ‘सिंधुदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला, कोणी म्हणेल मीच बांधला’ (व्हिडीओ)

Mumbai Cruise Drug Case | नवाब मलिकांचा मोठा गौप्यस्फोट ! म्हणाले – ‘भाजप नेत्याचा तो मेहुणा कोण?’

 

Related Posts