IMPIMP

Dhairyasheel Mohite Patil On Ranjit Naik-Nimbalkar | ‘आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती’, धैर्यशील मोहितेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर हल्लाबोल

by sachinsitapure

सोलापूर :  – Dhairyasheel Mohite Patil On Ranjit Naik-Nimbalkar | 2019 च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघातून (Madha Lok Sabha) भाजपने (BJP) रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती. त्यावेळी मोहिते-पाटील (Mohite Family) कुटुंबानं आपली सर्व ताकद पणाला लावून निंबाळकर यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. मात्र, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत धैर्यशील मोहीते-पाटील यांनी माढा लोकसभा लढवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र, भाजपने मोहिते-पाटील यांना डावलून पुन्हा निंबाळकर यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे नाराज झालेल्या मोहिते-पाटलांनी ‘तुतारी’ हाती घेऊन निंबाळकर यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून उमेदवारी मिळवली. मोहिते पाटील प्रचारादरम्यान निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती. ती चूक आम्ही करून बसलो, असं म्हणत धैर्यशील मोहिते-पाटील यांनी रणजतिसिंह निंबाळकरांवर निशाणा साधला आहे.

महाविकास आघाडीच्या सोलापूर मतदारसंघाच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थिती सभा पार पडली. यावेळी माढा लोकसभेचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील, शेकाप नेते अनिकेत देशमुख, रघुनाथराजे देशमुख, सक्षणा सलगर आदी नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना धैर्यशील मोहेते पाटील यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, पाच वर्षापूर्वी निवडणुकीच्या धामधूमीच्या आधी इथं जत्रा भरली होती. एकाने तंबू लावला होता. तो म्हणत होता, एका रुपयात देव पहा. जशी आता इथं गर्दी जमली तशीच गर्दी तिथे जमली होती. तंबूवाला रुपया घ्यायचा आणि आत जाणाऱ्याला सांगायचा की, आत जर तुला दोन गाढवं दिसले आणि तू बाहेर जाऊन सांगितले की मला गाढव दिसले. तर पुढील जन्मी तू गाढव होणार आहे. अशी परिस्थिती माढा आणि सोलापूर लोकसभेची झाली होती. आमच्यावर गाढवाला देव म्हणण्याची वेळ आली होती. ती चूक आम्ही करुन बसलो, अशा शब्दात मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना लक्ष्य केलं आहे.

MG Road Pune Accident | पुण्यातील एम.जी. रोडवर अपघात, अलिशान गाडीने अनेक वाहनांना उडवलं

Related Posts