IMPIMP

Pune Mundhwa Police | मौजमजेकरीता दुचाकी चोरणाऱ्याला 24 तासात मुंढवा पोलिसांकडून अटक (Video)

by sachinsitapure

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Mundhwa Police | मौजमजेसाठी दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला मुंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर 24 तासात गुन्हेगाराला अटक करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. ही कारवाई बीटी कवडे ब्रीज खाली करण्यात आली आहे. इमरान सिकंदर शेख (वय-34 रा. भाग्यश्री नगर, घोरपडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Arrest In Vehicle Theft Case)

याबाबत भागिराज शंकरअय्या मुंडलापाटी (वय-24 रा. पीसीबी क्वार्टर्स, घोरपडी पोलीस चौकी पाठीमागे, घोरपडी) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.2) फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांनी त्यांची हिरो होंडा मोटार स्प्लेंडर प्लस (एमएच 12 एमएन 9323) गाडी मुंढवा हद्दीतील बीटी कवडे रोडवरील युनिवर्सल फिटनेस क्लब या जीम बाहेर पार्क केली होती. त्या ठिकाणावरुन अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरुन नेली होती.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस शिपाई हेमंत पेरणे यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती चोरीची गाडी घेवुन बीटी कवडे ब्रीज खाली संशयितरित्या थांबला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडे दुचाकीबाबत विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार (IPS Amitesh Kumar), पोलीस सह आयुक्त (अतिरिक्त कार्यभार) रामनाथ पोकळे, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रंजनकुमार शर्मा, पोलीस उपायुक्त आर राजा, सह पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Sr PI Mahesh Balkotgi), तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संदिप जोरे, संतोष काळे, संतोष जगताप, दिनेश भांदुर्गे, दिनेश राणे, महेश पाठक, राहुल मोरे, पोलीस शिपाई स्वप्नील रासकर, हेमंत पेरणे, सचिन पाटील यांच्या पथकाने केली.

Related Posts