IMPIMP

Pune Municipal Corporation (PMC) | पुणे महानगरपालिकेतील उपायुक्त अजित देशमुख यांची मिळकत कर विभागप्रमुखपदी तर आशा राउत यांची घन कचरा व्यवस्थापन विभागप्रमुखपदी नियुक्ती

कचर्‍यातील सोन्यावर डोळा ठेवून असलेल्या अधिकार्‍याला ‘जागेवरच’ ठेवले

by nagesh
Pune PMC Election 2022 | Prabhag Ward structure unlikely to change after change of power in maharashtra ! Elections for local bodies will be held in September - trust the administrative authorities

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Municipal Corporation (PMC) | महापालिकेच्या मिळकतकर आकारणी व कर संकलन विभागाच्या
(PMC Property Tax Department) प्रमुखपदी उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh PMC) यांची नियुक्ती करण्यात आली असून उपायुक्त आशा राउत (Asha Raut PMC) यांची घन कचरा विभाग (PMC Solid Waste Management Department) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सह आयुक्त आणि मिळकतकर विभाग प्रमुख विलास कानडे (Vilas Kanade PMC) यांची अतिरिक्त आयुक्तपदी नियुक्ती झाल्याने हे बदल झाले आहेत. Pune Municipal Corporation (PMC)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

अजित देशमुख (PMC Deputy Commissioner Ajit Patil) आणि आशा राउत (PMC Deputy Commissioner Asha Raut) हे प्रतिनियुक्तीवर महापालिका सेवेत आलेले शासकिय अधिकारी आहेत.
देशमुख हे मागील वर्षभरापासून घन कचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख म्हणून काम पाहत आहेत.
त्यांच्याकडे निवडणूक विभागाचाही कार्यभार सोपविण्यात आला होता.
मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये महापालिका निवडणुकीसाठीची प्रारुप प्रभाग रचना करण्याचे काम देशमुख यांच्याच नेतृत्वाखाली झाले आहे.
तसेच घन कचरा विभागातही मागील वर्षभराच्या कालावधीत त्यांनी सर्व कचरा संकलन केंद्र संगणकीकृत करून एकमेकांशी जोडले आहेत.
त्यामुळे कचरा संकलन केंद्रावर प्रत्यक्षात येणारा कचरा आणि प्रक्रिया प्रकल्पांपर्यंतची वाहतूक याची सांगड घालणे अचूक झाले आहे.
महापालिका सेवेत दाखल झाल्यानंतर घोले रोड क्षेत्रिय अधिकारी म्हणून काम पाहीलेल्या राउत यांची काही महिन्यांपुर्वी उपायुक्तपदी पदोन्नती झाली असून त्या भांडार विभागाचे काम पाहत होत्या.
त्यांच्याकडे घन कचरा विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. Pune Municipal Corporation (PMC)

 

कचर्‍यातील सोन्यावर डोळा ठेवून असलेल्या अधिकार्‍याला ‘जागेवरच’ ठेवले

घन कचरा आणि मिळकत कर विभाग प्रमुखपदी वर्णी लागावी यासाठी महापालिकेतील काही अधिकारी देखिल प्रयत्नशील होते.
विशेषत: ‘कचर्‍यातील सोन्यावर’ डोळा ठेवून असलेल्या एका अधिकार्‍याने या पदासाठी फिल्डिंगही लावली होती.
परंतू या अधिकार्‍याच्या कामाची पद्धत आणि पुर्व इतिहास पाहता त्याला वरिष्ठांनी तूर्तास ‘जागेवरच’ ठेवल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.

 

Web Title :- Pune Municipal Corporation (PMC) | Pune Municipal Corporation Deputy Commissioner Ajit Deshmukh has been appointed as the Head of Property Tax Department and Asha Raut has been appointed as the Head of Solid Waste Management Department

 

हे देखील वाचा :

Pune Crime | 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या विक्रांत शिवणकर याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

Pune Crime | पुणे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांकडून अटक

Sangli Crime | धक्कादायक ! जेवण दिले नाही म्हणून दगड आणि लोखंडी फुंकणीने मारून आईचा खून; नराधम मुलास अटक

 

Related Posts