IMPIMP

Pune Crime | 25 लाखाची खंडणी मागणाऱ्या विक्रांत शिवणकर याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

by nagesh
Pune Crime | The sister's son tried to rape the woman and the girl by abducting her in anger

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | मुंबईतील कंपनीला दिलेल्या कामाचे उर्वरित पैसे देण्यासाठी फोन करुन धमकी (Threat) देऊन व्यावसायिकाकडे 25 लाखाची खंडणी (Ransom) मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पुण्यातील विक्रांत सुरेश शिवणकर (Vikrant Suresh Shivankar) याच्यावर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात (Market Yard Police Station) आयपीसी IPC 385 अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात (Pune Crime) आला आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत श्रेनिक पुखराज ओसवाल Shreenik Pukhraj Oswal (वय-35 रा. मार्केट यार्ड, पुणे) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विक्रांत शिवणकर (वय-30 रा. जगदंब भवन रोड, पिसोळी, पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 एप्रली 2022 रोजी रात्री पावणे नऊच्या सुमारास मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात (Gangadham Chowk) घडला आहे.(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी डिसेंबर 2021 मध्ये दिल्ली येथील इंडिया गेट (India Gate Delhi) येथी आर्मी शो (Army Show) चे काम घेतले होते. हे काम त्यांनी मुंबईतील नरेंद्र राहुरीकर (Narendra Rahurikar) यांच्या डी फाईन आर्ट (De Fine Art) या कंपनीला दिले होते. कामाच्या मोबदल्यात राहुरीकर यांना 30 लाख रुपये देण्याचे ठरले होते. त्यापैकी 15 लाख रुपये अॅडव्हान्स दिला होता. मात्र, डी फाईन आर्ट कंपनीने व्यवस्थित काम न केल्याने फिर्यादी यांनी इतरांकडून ते काम पूर्ण करुन घेतले. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. दरम्यान, त्यांनी नरेंद्र राहुरीकर यांना फेब्रुवारी महिन्यात वकिलामार्फत नोटीस पाठवली होती.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये कोणताही व्यवहार झालेला नसताना आणि फिर्यादी हे कोणतेही पैसे देणे लागत नासताना
27 एप्रिल रोजी रात्री आरोपी विक्रांत शिवणकर याने फिर्यादी यांना फोन करुन नरेंद्र राहुरीकर याच्या
कंपनीचे राहिलले 25 लाख रुपयांचे पेमेंट कधी देणार अशी विचारणा केली.
तसेच तुला पेमेंट द्यायचे आहे का नाही, तुझे घर व ऑफिसचा पत्ता मला माहित आहे.
तुझ्या घरातील लोकांची, मित्रांची मला माहिती आहे. तुझ्या घरी येतो, पोरं पाठवतो अशी धमकी देऊन
फिर्यादी यांच्याकडे 25 लाखाची खंडणी मागितली. फिर्यादी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास मार्केट यार्ड पोलीस करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Vikrant Shivankar seeking ransom of Rs 25 lakh

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुणे स्थानकात बॉम्ब ठेवल्याची अफवा पसरवणाऱ्या दोघांना लोहमार्ग पोलिसांकडून अटक

Sangli Crime | धक्कादायक ! जेवण दिले नाही म्हणून दगड आणि लोखंडी फुंकणीने मारून आईचा खून; नराधम मुलास अटक

Maharashtra Municipal Election 2022 | राज्यात सप्टेंबर अखेरपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणे अशक्य – इलेक्शन कमिशनची माहिती

 

Related Posts