IMPIMP

Pune – Navale Bridge Accident | नवले पूलावरील भीषण अपघात : टँकरचे ब्रेक फेल झाले नव्हते, RTO कडून मोठा खुलासा, पोलिस म्हणाले….

by nagesh
Pune – Navale Bridge Accident | pune navale bridge truck accident police confirms rto assessment revelas no brake failure in truck cause accident

पुणेसरकारसत्ता ऑनलाईन  – Pune – Navale Bridge Accident | पुणे- बंगलोर हायवेवर (Pune Bangalore Highway) नवले पुलावर
(Pune – Navale Bridge Accident) काल रात्री एक मोठा अपघात झाला. या अपघातात एका ट्रकने एकाच वेळी 24 वाहनांना धडक दिली आहे.
सुदैवाने या अपघातात कोणतीही प्राणहानी झाली नाही, तरी 10 जण जखमी झाले आहेत. शिवाय, प्रचंड प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. ट्रकचा
ब्रेकफेल (Break Fail) झाल्यामुळे हा अपघात (Pune – Navale Bridge Accident) झाला असावा, असा प्राथमिक अंदाज लावला जात होता. पण
तपासानंतर वेगळे कारण समोर येत आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीनंतर नवी माहिती समोर आली. चालकाने उतार असल्याने इंजिन बंद केले आणि गाडी न्यूट्रलमध्ये (Neutral) टाकून तो चालक गाडी चालवत होता. पण वेग प्रचंड वाढला आणि नियंत्रण सुटून वेळेत ब्रेक दाबता न आल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेनंतर चालक घटनास्थळावरून फरार झाला. पोलीस चालकाचा शोध घेत आहे. ‘मणिराम छोटेलाल यादव’ असे चालकाचे नाव असून, तो मध्य प्रदेशचा रहिवाशी आहे. पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Pune – Navale Bridge Accident)

 

सिंहगड रस्ता विभागाचे (ACP Sinhagad Road Division) सहाय्यक पोलिस आयुक्त सुनील पवार (ACP Sunil Pawar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, “आरटीओने वाहनाची तपासणी केली तेव्हा गाडीचा ब्रेक फेल झाला नसल्याचे स्पष्ट झाले. इंधन वाचवण्यासाठी उतारावर इंजिन बंद करून न्यूट्रल गेअरवर गाडी चालवण्याचा प्रयत्न चालकाने केला. पण वाहनाचा वेग वाढल्याने तो ब्रेक दाबू शकला नाही आणि हा अपघात (Pune – Navale Bridge Accident) घडला.”

 

जखमी व्यक्तींची नावे पुढील प्रमाणे आहेत.

1) राहुल भाऊराव जाधव (रा.वारजे)

2) शुभम विलास डांबळे (रा.वारजे)

3) तुषार बाळासाहेब जाधव (रा.वारजे)

4)आनंद गोपाळ चव्हाण (रा. सहयोग नगर, पुणे)

5) राजेंद्र देवराम दाभाडे (रा. माणिकबाग, पुणे)

6) साहू जुनेल (रा.कोंढवा पुणे)

7) ऑस्कर लोबो (रा. कोंढवा पुणे)

8) मधुरा संतोष कारखानीस (वय 42 वर्ष रा. वनाज)

9) चित्रांक संतोष कारखानीस (वय 8 वर्ष)

10) तनीषा संतोष कारखानीस (वय 16 वर्ष)

11) विदुला राहुल उतेकर (वय 45 वर्ष)

12) अनघा अजित पभुले वय 51 वर्ष रा. वडगाव पुणे)

13) अनिता अरुण चौधरी (वय 54 वर्ष रा. राहटणी चौक, पुणे)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

Web Title :- Pune – Navale Bridge Accident | pune navale bridge truck accident police confirms rto assessment revelas no brake failure in truck cause accident

 

हे देखील वाचा :

Sanjay Raut | राहुल गांधींचा संजय राऊतांना फोन; शिवसेना खासदार म्हणाले – ‘हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय…’

Kangana Ranaut On Tabu – Drishyam 2 | ‘दृश्यम 2’मधील तब्बूविषयी कंगनाचं मोठं वक्तव्य; पोस्ट व्हायरल

FIFA World Cup 2022 | इक्वेडोरने कतारला हरवून ९२ वर्षांपूर्वीचा मोडला ‘हा’ मोठा विक्रम

Pune Minor Girl Rape Case | ११ वर्षाच्या सावत्र मुलीवर बापानेच केला अत्याचार, दत्तवाडी परिसरातील घटना

 

Related Posts