IMPIMP

FIFA World Cup 2022 | इक्वेडोरने कतारला हरवून ९२ वर्षांपूर्वीचा मोडला ‘हा’ मोठा विक्रम

by nagesh
FIFA World Cup 2022 | fifa world cup 2022 ecuador vs qatar match ecuador beat host qatar 92 year record broken

सरकारसत्ता ऑनलाईन – इक्वेडोर (Ecuador) संघाने फिफा विश्वचषक 2022 (FIFA World Cup 2022) स्पर्धेतील पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात केली आहे. इक्वेडोर संघाने अ गटात यजमान कतारविरुद्ध (Qatar) 2-0 असा विजय मिळवला. इक्वेडोरच्या फॉरवर्ड एनर व्हॅलेन्सियाने (Ener Valencia) सामन्यातील दोन्ही गोल केले. यासह कतार हा यजमान म्हणून पहिला सामना गमावणारा फुटबॉल विश्वचषकाच्या (Football World Cup) इतिहासातील पहिला देश ठरला आहे. या स्पर्धेच्या 92 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच यजमान देशाला सलामीचा सामना गमवावा लागला आहे. (FIFA World Cup 2022)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

या सामन्याच्या तिसऱ्या मिनिटाला इक्वेडोरने कतारच्या पोस्टमध्ये गोल केला, पण व्हीएआरने तो फेटाळला. यानंतर 16 व्या मिनिटाला एनर व्हॅलेन्सियाने पेनल्टीद्वारे स्पर्धेतील पहिला गोल केला. 31 व्या मिनिटाला व्हॅलेन्सियाने आणखी एक गोल करून इक्वेडोर संघाला विजय मिळवून दिला. या स्पर्धेत कतार आपला पहिला विश्वचषक खेळत आहे. इक्वेडोरचा संघही विश्वचषकात फारसा जुना नाही. या संघाने 2006 च्या विश्वचषकात पोलंड (Poland) आणि कोस्टा रिकासारख्या (Costa Rica) संघांना पराभूत करून बाद फेरीत प्रवेश केला होता. यानंतर इंग्लंडकडून (England) पराभूत झाल्यानंतर इक्वेडोरला राऊंड ऑफ 16 मधून बाहेर पडावे लागले होते.
विश्वचषकाच्या इतिहासात इक्वेडोरची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

आज या स्पर्धेत तीन सामने खेळवले जाणार आहेत. ब गटातील पहिला सामना इंग्लंड (England) आणि
इराण (Iran) यांच्यामध्ये होणार आहे. तर दुसरा सामना अ गटातील सेनेगल (Senegal) आणि नेदरलँड्स
(Netherlands) यांच्यामध्ये होईल. तर तिसरा सामना ब गटातील अमेरिका (United States) आणि
वेल्स (Wales) यांच्यामध्ये होणार आहे.

 

Web Title :- FIFA World Cup 2022 | fifa world cup 2022 ecuador vs qatar match ecuador beat host qatar 92 year record broken

 

हे देखील वाचा :

Pune Minor Girl Rape Case | ११ वर्षाच्या सावत्र मुलीवर बापानेच केला अत्याचार, दत्तवाडी परिसरातील घटना

Pune Crime | बनावट कुलमुखत्यार तयारकरुन 18 लाखांची फसवणूक, दोन महिलांसह 3 जणांविरुद्ध FIR; विमाननगर परिसरातील प्रकार

MNS | राज्यपालांच्या वक्तव्याचा मनसेकडून समाचार; छत्रपती शिवाजी महाराज कायम आदर्श राहतील

 

Related Posts