IMPIMP

Pune – Navale Bridge Accident | नवले ब्रिजजवळील वडगाव पुल परिसरात भीषण अपघात, पोलिसांच्या गाडीसह 10 वाहनांना धडक

by nagesh
Pune – Navale Bridge Accident | Terrible accident in Vadgaon bridge area near Navale Bridge, 10 vehicles including police car collided

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन – Pune – Navale Bridge Accident | मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर (Mumbai-Bangalore Bypass)
वडगाव उड्डाण पुलाजवळ (Vadgaon Flyover) मंगळवारी (दि.14) सकाळी भीषण अपघात झाला. एका भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल
झाल्याने ट्रकने पोलिसांच्या गाडीसह 10 वाहनांना जोरात धडक दिली. सुदैवाने या अपघातात (Pune – Navale Bridge Accident) कोणी जखमी
झाले नाही. याप्रकरणी पोलिसांनी (Pune Police) ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

 

दिलीप हरिष सिंह (वय-27 रा. राजस्थान) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात (Sinhagad Road Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. अपघातानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी (Traffic Jam) झाली होती. वाहतूक पोलीस (Pune Traffic Police) आणि स्थानिक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूरहून मुंबईकडे हा ट्रक निघाला होता.
सकाळी साडेनऊच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर नवले पुलाजवळील (Pune – Navale Bridge Accident) वडगाव पुलाच्या उतारावर चालकाचे नियंत्रण सुटले.
तिव्र उतार असल्याने आणि ब्रेक फेल झाल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि एकापाठोपाठ दहा वाहनांना धडक दिली.

 

अपघातात ग्रामीण पोलिसांची (Pune Rural Police) गाडी, एक टेम्पो, आठ कारचे नुकसान झाले.
सकाळीच अपघात झाल्याने प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदारांची चांगलीच गैरसोय झाली.
अपघाताची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस व वाहतूक विभागाने घटनास्थळी धाव घेतली.
अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली. या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नाही.
पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

Web Title :- Pune – Navale Bridge Accident | Terrible accident in Vadgaon bridge area near Navale Bridge, 10 vehicles including police car collided

 

हे देखील वाचा :

Solapur Crime News | सोलापूर शासकीय रुग्णालयातील डॉक्टरची हॉस्टेलच्या टेरेसवर आत्महत्या, परिसरात खळबळ

PNB Scam | फरार हिरे व्यापारी नीरव मोदीच्या पुण्यातील फ्लॅटला ग्राहक मिळेना, किंमती कमी करुन पुन्हा लिलाव; जाणून घ्या फ्लॅटची किंमत

Pune Crime News | फिनिक्स मॉलमध्ये माथाडीच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या रविंद्र ससाणे व त्याच्या टोळीवर ‘मोक्का’

 

Related Posts