IMPIMP

Pune News | पुण्यातील ‘आरे’ वाचविण्यासाठी पर्यावरणप्रेमी संस्थांचे आदित्य ठाकरे यांना साकडे

by nagesh
Pune News | Aditya Thackeray of environmental organizations to save aarey in Pune

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | तळजाई टेकडीवरचा जैवविविधतेने समृद्ध असणारा निसर्गरम्य परिसर विकासाच्या नावाखाली उद्ध्वस्त करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. तळजाई टेकटीवरील प्रस्तावित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पास विरोध असल्याबाबत आणि नदी-नाले यांचा होणारा –हास थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचे निवेदन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांना देण्यात (Pune News) आले.

राज्याचे पर्यावरणमंत्री म्हणून हे प्रकल्प रद्द करावेत तसेच येथील निसर्ग संवर्धणाकरिता वेगवेगळे उपक्रम राबवावेत आणि जसे मुंबईचा ऑक्सिजन म्हणजे आरे वाचविले त्याच धर्तीवर पुण्यातील ऑक्सिजन म्हणजेच तळजाई टेकटी वाचवावी अशी विनंती या निवेदनाद्वारे पर्यावरणप्रेमी संस्थांनी आदित्य ठाकरे यांना केली.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

यावेळी माय अर्थ फांउडेशनचे अनंत घरत, वनराईचे सदस्य अमित वाडेकर, समग्र नदी परिवारचे अध्यक्ष सुनिल जोशी, इन्वार्मेंट क्लब ऑफ इंडीयाचे ललित राठी, सिंहगड युवा फांउडेशनचे मनिष जगदाळे, स्वराज्य यज्ञ समुहचे प्रसाद चावरे उपस्थित (Pune News) होते.

पुणे शहरातील मध्यभागातून वाहणारा मुख्य नाला आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रहाव बदलण्याचा घाट पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून घातला जात आहे. त्यामुळे भविष्यात मोठी जिवित व वित्त हाणी होऊ शकते त्यामुळे आपण याकडेदेखील लक्ष घालण्याची विनंती करण्यात आली. तसेच पूररेषांचे नकाशे आणि नदीकाठच्या भागातील बांधकाम परवानगी याविषयावर देखील लक्ष घालण्याची विनंती या निवेदनात करण्यात आली.

सहकारनगर भागातील तळजाई टेकडीवरील सुमारे १०७ (एकशे सात एकर) जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा
प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प आराखडा (डीपीआर) पुणे महापालिका प्रशासनाने स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर करून या प्रकल्पास १२० कोटी खर्च केला जाणार आहे.
त्यामुळे येथील जागेचे कॉंक्रिटीअकरण होउन नैसर्गिक अधिवास संपुस्टात येण्याबरोबरच पुण्यातील ऑक्सिजन पार्क म्हणून
ओळखल्या जाणाऱ्या तळजाई टेकडीची ओळख पुसली जाण्याची भिती निर्माण होत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

याठिकाणी प्रस्तावित बांधकामे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होणार व जमीन सपाटीकरण होणार,
अनेक प्राणी, पक्षी यांचा नैसर्गिक अधिवास नष्ट होणार हे उघड असल्याने या ठिकाणी या प्रकल्पास निसर्गप्रेमी विरोध दर्शवित आहेत.
तळजाई टेकडीची जैवविविधता नैसर्गिकदृष्ट्या जशी आहे तशी राहावी, असे पर्यावणप्रेमींना वाटत आहे.

 

Web Title :- Pune News | Aditya Thackeray of environmental organizations to save aarey in Pune

 

हे देखील वाचा :

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 3,253 जण ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी

Satara Black Magic Case | ‘ती’ मुलगी बालसुधारगृहात ! स्मशानात अघोरी पूजा करणाऱ्या 6 जणांना पुण्यातून अटक

Teacher Provident Fund | शिक्षकांसाठी खूशखबर ! अखेर भविष्य निर्वाह निधीतील मंजूर रक्कम मिळणार

 

Related Posts