IMPIMP

Teacher Provident Fund | शिक्षकांसाठी खूशखबर ! अखेर भविष्य निर्वाह निधीतील मंजूर रक्कम मिळणार

by nagesh
Maharashtra Primary Schools Reopen | Indications from the maharashtra government to start Primary Schools

सरकारसत्ता ऑनलाइन  – Teacher Provident Fund | राज्यातील शिक्षकांसाठी (Teacher) आता एक महत्वाची माहिती समोर आली आहे. मागील वर्षभरापासून बी. डी. एस. प्रणाली (B. D. S. system) बंद होती. अखेर ती सुरु झाली आहे. यामुळे आता शिक्षकांना भविष्य निर्वाह निधी (Teacher Provident Fund) मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आलं आहे. बारामती तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष हनुमंत शिंदे (Hanumantha Shinde) व सरचिटणीस सुरेंद्र गायकवाड (Surendra Gaikwad) यांनी ही माहिती दिली आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

बी. डी. एस.प्रणाली (B. D. S. system) सुरु व्हावी. याकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष राजाराम वरुटे (Rajaram Varute)
व सरचिटणीस केशवराव जाधव (Keshavrao Jadhav) यांनी सातत्याने पाठपुरावा करीत होते.
अखेर त्याला यश आलं आहे. बी. डी. एस. प्रणाली बाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), अर्थ खात्याचे सचिव यांच्याकडे निवेदन देण्यात आले होते.
त्याचबरोबर, 27 सप्टेंबर रोजी शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी (Education Commissioner Vishal Solanki) यांची महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे
अध्यक्ष राजाराम वरुटे व सरचिटणीस केशवराव जाधव, राजू बालगुडे यांनी भेट घेऊन बी. डी.एस.प्रणाली लवकरात लवकर सुरु व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. (Teacher Provident Fund )

 

दरम्यान, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी (Education Commissioner Vishal Solanki) यांनी बी. डी. एस.प्रणाली तातडीने सुरु करण्याबाबत कार्यवाही करू अशी ग्वाही दिली होती.
यावरुन अखेर बी. डी. एस. प्रणाली सुरु करण्यात आली आहे.
दरम्यान, मागील वर्षभर बी. डी. एस. प्रणाली (B. D. S. system) बंद असल्याने अनेक शिक्षकांना भविष्य निर्वाह निधीतून कर्ज मंजूर होऊनही राज्य शासनाकडून रक्कम न मिळाल्याने शिक्षकाना भविष्य निर्वाह (Provident Fund) निधीची रक्कम मिळाली नाही.
त्यामुळे शिक्षकांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. अखेर हा मार्ग मोकळा झाला आहे.

 

Web Title : Teacher Provident Fund | good news teachers finally pave way provident funds

 

हे देखील वाचा :

Bank Holidays In Maharashtra | ऑक्टोबरमध्ये 10 दिवस बंद राहणार बँका; खोळंबा टाळण्यासाठी तपासा सुट्ट्यांची लिस्ट

Radhakrishna Vikhe Patil | ‘जाणत्या राजा’ला सहकार मंत्रालय सुरू करण्याचे का सुचले नाही? – भाजप

Sachin Ahir | महाआघाडी करण्याची इच्छा, मात्र नाही झाल्यास स्वबळावर लढण्याची तयारी – सचिन अहिर

 

Related Posts