IMPIMP

Pune News | डाबर ओडोमोसने डेंग्यू मुक्त भारत मोहीम सुरू केली; डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्याबाबत जनजागृती

by sachinsitapure
Pune News | Dabur Odomos launches Dengue Free India campaign; Awareness about prevention of Dengue and Malaria

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune News | भारताला डेंग्यूमुक्त (Dengue ) बनवण्याचे ध्येय पुढे नेत, डाबरच्या देशातील आवडत्या वैयक्तिक ऍप्लिकेशन मॉस्किटो रिपेलेंट ब्रँड Application Mosquito Repellant Brand) ओडोमोसने (Odomos) #MakingIndiaDengueFree ही विशेष मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेद्वारे लोकांपर्यंत पोहोचून त्यांना डासांपासून बचाव करण्याच्या उपायांची जाणीव करून दिली जाईल. डेंग्यू पसरवणाऱ्या डासांपासून सुरक्षित राहण्यासाठी त्यांना ओडोमोस मॉस्किटो रिपेलेंट क्रीमचे (Odomos Mosquito Repellant Creams) नमुनेही मोफत दिले जातील. (Pune News)

Join Our SarkarsattaWhatsapp GroupTelegram GroupFacebook Page for every Update

डाबरने पुणे शहरात ही मोहीम सुरू केली, जिथे बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ प्राथमिक शाळेत (Barrister Vitthalrao Gadgil Prathamik School) 300 हून अधिक मुलांसह एक विशेष जनजागृती सत्र आयोजित केले गेले. यावेळी विद्यार्थी, त्यांचे शिक्षक व पालकांना डेंग्यू पसरवणाऱ्या डासांपासून बचाव करण्याच्या पद्धतींची माहिती देण्यात आली. यासोबतच डासांपासून पसरणाऱ्या आजारांना प्रतिबंध करण्याबाबत आवश्यक माहिती देण्यात आली.

 

‘ओडोमोस नेहमीच डेंग्यू आणि इतर घातक डासांपासून पसरणाऱ्या आजारांपासून लोकांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. या मोहिमेला पुढे नेत आम्ही ही मोहीम हाती घेतली आहे, ज्यामुळे सर्वसामान्यांना डासांपासून होणा-या आजारांपासून सुरक्षित राहण्याची जाणीव होईल. गेल्या काही वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे लोकांमध्ये डेंग्यूबाबत जागृतीचा अभाव आहे. एडिस इजिप्ती हा डेंग्यू पसरवणारा डास दिवसा चावतो. अशा परिस्थितीत शाळेत जाणारे विद्यार्थी आणि कार्यालयात जाणारे लोक या डासांचा सहज बळी ठरतात. त्यामुळे, डेंग्यूच्या डासांपासून ते स्वत:ला कसे सुरक्षित ठेवू शकतात याबद्दल सर्वसामान्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे आवश्यक आहे,” असे सनथ पुलिक्कल, मार्केटिंग हेड – होम केअर (Sanath Pulikkal, Marketing Head- Home Care), डाबर इंडिया लिमिटेड (Dabur India Ltd) म्हणाले. (Pune News)

यावेळी बोलताना डॉ.परमेश्वर अरोरा (Dr. Parmeshwar Arora) म्हणाले, “डेंग्यू सारख्या आजारापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंध ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पावसाळ्यात डासांची पैदास सहज होते, त्यामुळे शाळकरी मुले आणि कार्यालयात जाणाऱ्यांच्या सुरक्षेबाबत जनजागृती करणे अत्यंत आवश्यक आहे. हाच विचार करून मेकिंग इंडिया डेंग्यूमुक्त अभियान (Making India Dengue Free Campaign) सुरू करण्यात आले आहे. मला त्याच्याशी जोडण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे.

डेंग्यू आणि मलेरियाचे (Malaria) डास दिवसा चावतात.
शाळकरी मुले आणि ऑफिसला जाणारे लोक डास चावल्यानंतर आजारी पडण्याची शक्यता असते.
ओडोमोस हे एकमेव वैयक्तिक वापराचे उत्पादन आहे जे दिवसा चावणाऱ्या डासांपासून संपूर्ण संरक्षण देऊन
प्राणघातक रोगांचा प्रसार रोखते. अनुभवी बालरोगतज्ञांनी केलेल्या अभ्यासात,
ओडोमोस मुलांसाठी आणि अगदी लहान मुलांसाठीही सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले आहे.
डाबर ओडोमोसच्या वैयक्तिक ऍप्लिकेशन्सच्या श्रेणीमध्ये वापरण्यास सुलभ त्वचा-अनुकूल अँटी-मॉस्किटो क्रीम,
स्प्रे आणि फॅब्रिक रोल-ऑन समाविष्ट आहेत,’ संतोष जैस्वाल, श्रेणी प्रमुख – होम केअर, डाबर इंडिया लिमिटेड म्हणाले.

Web Title : Pune News | Dabur Odomos launches Dengue Free India campaign; Awareness about prevention of Dengue and Malaria

Pune Crime News | गुन्हे शाखेकडून घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला 48 तासात अटक, 4 लॅपटॉप जप्त

Related Posts