IMPIMP

Pune News | देवेंद्र पोटफोडे यांची पुणे शहराचे नवीन अग्निशमन प्रमुख म्हणून नियुक्ती; अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून केला आनंद साजरा

by nagesh
Pune News | Devendra Potphode appointed as new Fire Chief of Pune City The firemen celebrated by distributing sweets and bursting crackers

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune News | पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA ) चे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे (Devendra Potefhode) यांची महाराष्ट्र शासनाने पुणे महानगरपालिकाच्या Pune Municipal Corporation (PMC) मुख्य अग्निशमन अधिकारी या रिक्त पदावर अतिरिक्त कारभार देऊन नियुक्ती केली असून पीएमआरडीए अग्निशमन विभागा बरोबरच महापालिका अग्निशमन दलाचा कार्यभार पाहणार आहेत. अत्यंत सकारात्मक व कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असणाऱ्या अधिकाऱ्यांची राज्यातील क्षेत्रफळाच्या बाबतीत सर्वात मोठ्या महानगर पालिका व सर्वात मोठ्या महानगर प्राधिकरण अग्निशमन प्रमुख पदी नेमणूक होताच अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मिठाई वाटून आणि फटाके फोडून आनंद साजरा केला. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

देवेंद्र पोटफोडे हे राष्टीय अग्निशमन सेवा महाविद्यालय नागपूर येथून सुवर्णपदक विजेते असून मागील ३० वर्षांपेक्षा अधिक काळापासून त्यांनी अग्निशमन विभागाच्या सेवेत आहे.
एमआयडीसीमध्ये तसेच पुणे महानगरपालिका (पीएमसी) चे मुख्य अग्निशमन अधिकारी म्हणूनही या पूर्वी जबाबदारी सांभाळलेली आहे.
एमआयडीसी ची औद्योगिक क्षेत्रे आणि शहरी भागात अनेक फायर, रेस्क्यू कॉल्स, भीषण आगीची दुर्घटना, स्फोट, नैसर्गिक आपत्ती अशा विविध घटनां स्वत:च्या नेतृत्वात यशस्वीरित्या सामना केला असून,
अलीकडच्या काळातील, सिरम इन्स्टीट्यूटमधील आगीची दुर्घटना आणि पिरगुंट येथील एस व्ही ऍक्वा ही त्यापैकीच काही उदाहरणं आहेत . (Pune News)

 

 

बांधकाम नियंत्रण नियमावली आणि एनबीसी च्या तरतुदींनुसार विविध प्रस्तावित नागरी तसेच औद्योगिक प्रकल्प
आणि मोठ्या प्रकल्पांना अग्निशमन मंजूरी देण्याची जबाबदारी त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडली असून
कोविड काळात संपूर्ण राज्यात सर्वात सक्षम व प्रभावी पणे पुणे जिल्ह्यातील रग्णालयांचे फायर ऑडिट समन्वयाचे काम त्यांनी पार पाडले आहे.
राज्य सरकारच्या अनेक अग्निशमन विषयक समित्यांवरही तांत्रिक तज्ज्ञ म्हणून जबाबदारी पार पाडली आहे.
अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया, दुबई आदी देशातील विकसित अग्निशमन सेवांना भेटी दिल्या आहेत.
तर २०११ आणि २०२१ असे दोन वेळा राष्ट्रपती पदक मिळविण्याचा बहुमान प्राप्त असून
त्यांनी राष्ट्रपती गुणवत्तापूर्ण सेवा पदक व विशिष्ट अग्निशमन सेवा पदकही पटकाविलेले आहे.
पुणे अग्निशमनदलाची प्रतिमा देशपातळीवर उंचावण्याची मनीषा त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारताना केली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

Web Title : –  Pune News | Devendra Potphode appointed as new Fire Chief of Pune City The firemen celebrated by distributing sweets and bursting crackers

 

हे देखील वाचा :

Pune News | पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष देविचंद जैन व ट्रस्टी राजेश शहा यांचा सत्कार

Jalgaon Crime | शर्यतीने घेतला चिमुकल्याचा बळी, कारच्या धडकेत जळगावमध्ये 11 वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Pune Crime | खडकी बाजारमधील मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 10 जण ताब्यात

 

Related Posts