IMPIMP

Pune News | युनेस्को पुरस्कार ‘कलानिपुण’च्या चैत्राली जोशी, काव्या केंची यांना

by nagesh
Pune News | Kalanipun's Kavya Kenchi And Chaitrali Joshi of UNESCO Award

पुणे : सरकारसत्ता ऑनलाईन  – Pune News | युनेस्को पुरस्कृत ऑल इंडिया ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स २०२२ या काठमांडू नेपाळ येथे झालेल्या अकराव्या स्पर्धेत पुण्याच्या कलानिपुण नृत्यविद्यालयाच्या चैत्राली जोशी आणि काव्या केंची यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. (Pune News)

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

नेपाळच्या काठमांडू येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक कला स्पर्धेत देशातल्या आणि विदेशातल्या स्पर्धकांनी भाग घेतला होता. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ ख्यातनाम गायिका अमृता फडणवीस आणि युनेस्कोच्या नेपाळमधील प्रतिनिधी बाबुराम अधिकारी तसेच संस्थेचे हेमंत वाघ यांच्या हस्ते झाला. यावेळी अमृता फडणवीस यांना संस्थेच्या ‘स्वामी विवेकानंद पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी सर्वश्री दिग्दर्शक श्याम बेनेगल, नृत्यांगना सोनल मानसिंग यांना प्रदान करण्यात आला होता. या अकराव्या स्पर्धेत मोठ्या गटातील द्वितीय पुरस्कार चैत्राली अतुल जोशी आणि लहान गटातील द्वितीय पुरस्कार काव्या मृणाल केंची यांना प्रदान करण्यात आला. तिने भरतनाट्यम नृत्य सादर केले होते. (Pune News)

 

प्रास्ताविकात संस्थेच्या रत्ना वाघ यांनी संस्थेची आणि आजवर झालेल्या स्पर्धेची माहिती दिली.
युनेस्कोचे बाबूराम अधिकारी यांनी युनेस्कोच्या सांस्कृतिक कार्याचा आढावा घेतला.
नेपाळ हे एक सांस्कृतिक परंपरा जपणारे राष्ट्र असल्याने अशाप्रकारच्या उपक्रमांना कायम पाठींबा देत आला असं सांगितलं. अमृता फडणवीस यांनी आपल्याला दिलेल्या पुरस्काराबद्धल संस्थेचे आभार मानले आणि उत्तरादाखल ‘मोगरा फुलला’ हा अभंग सादर केला.

 

Web Title :- Pune News | Kalanipun’s Kavya Kenchi And Chaitrali Joshi of UNESCO Award

 

हे देखील वाचा :

IND vs SL 1st ODI | आजपासून भारत- श्रीलंका वनडे मालिकेला सुरुवात; जाणून घ्या कधी आणि कुठे पाहता येणार सामना

Nanded Firing Case | नांदेडमध्ये महिला काँग्रेस कार्यकर्त्यावर गोळीबार

MP Sanjay Raut | संजय राऊतांनी व्यक्त केली इच्छा, म्हणाले – ‘माझ्या बायोपिकमध्ये…’

CM Eknath Shinde | ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात बॅनरबाजी…

 

Related Posts